News Flash

करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या, भाजपा खासदाराचा सल्ला

गोमूत्र पिल्यानं शरीराची विषाणूसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते

पश्चिम बंगालमधील भाजपा खासदार आणि प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांचं, ‘करोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या’ हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजतंय. गोमूत्राची माहिती देताना घोष यांनी लोकांना करोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. ‘गोमूत्र पिल्यानं शरीराची विषाणूसोबत लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते’ असंही दिलीप घोष यांचं म्हणणं आहे.

दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये खासदार घोष एका बैठकीत असून तेथे ते घरगुती गोष्टींचा आरोग्यसाठी वापर समजावून सांगत आहे. हे सांगताना त्यांनी गोमूत्र पिल्यानं लोकांचं आरोग्य सुधारतं तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते, असा दावा केला आहे.

५५ वर्षीय घोष या व्हिडीओत म्हणतात की, ‘मी जर गायीबद्दल बोलायला लागलो तर अनेकजणांना ते पटणार नाही ते असहज होतील. गाढवं कधीही गायीची महती समजू शकणार नाहीत. हा भारत आहे. ही भगवान श्रीकृष्णाची धरती आहे. इथं आपण गायीची पूजा करतो. आपल्याला आरोग्य सुधारण्यासाठी गोमूत्र पिणं आवश्यक आहे. जे दारू पितात त्यांना गायीचं महत्त्व कसं काय लक्षात येईल.’

दिलीप घोष यांनी पहिल्यांदाच असं वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. याअगोदरही ते अशी वक्तव्य करून चर्चेत आले होते. ‘गाईच्या दुधात सोनं असतं’ असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर ते ट्रोलही झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 8:15 am

Web Title: west bengal bjp chief dilip ghosh said drink cow urine to fight coronavirus nck 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 अमेरिकेची भारतात ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक
2 निवासी संकुलातही करोना केंद्र
3 देशात सलग तिसऱ्या दिवशी ३० हजार रुग्ण
Just Now!
X