08 March 2021

News Flash

भर बाजारात लटकलेल्या अवस्थेत आढळला भाजपा आमदाराचा मृतदेह, हत्येचा संशय

भाजपा आमदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पश्चिम बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत भाजपा आमदाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर दिनाजपूर येथील एका दुकानाच्या बाहेर आमदार देवेंद्र नाथ रे यांचा मृतदेह आढळला. भाजपाने ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. घरापासून एक किमी अंतरावर देवेंद्र यांचा मृतदेह आढळला. देबेंद्र यांच्या कुटुंबातील एका सदस्याने केलेल्या दाव्यानुसार, काही लोक मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घरी आले आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन गेले. देवेंद्र यांच्या कुटुंबाने याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

सकाळी काही लोकांना देवेंद्र यांचा मृतदेह दुकानाबाहेर लटकलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. भाजपाने देवेंद्र यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ट्विट केलं असून ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.

जे पी नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “संशयितरित्य अत्यंत क्रूरपणे देवेंद्र नाथ रे यांची करण्यात आलेली हत्या अत्यंत धक्कादायक आहे. यावरुन ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील गुंडाराज आणि कायदा सुवस्था ढिसाल असल्याचं स्पष्ट होत आहे”.

देवेंद्र नाथ रे यांनी २०१६ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरुन सीपीएमच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. काँग्रेसने पाठिंबा दिलेला होता. पण गतवर्षी लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 11:35 am

Web Title: west bengal bjp mla debendra nath ray found hanging in market sgy 87
Next Stories
1 पद्मनाभ स्वामी मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
2 सचिन पायलट यांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस नेत्याची माहिती
3 सचिन पायलट यांची बेशिस्त खपवून घेणार नाही – काँग्रेस
Just Now!
X