News Flash

“केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही, म्हणून..”, ममता बॅनर्जींनी साधला निशाणा!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

ममता बॅनर्जी यांचा मोदी सरकारवर निशाणा!

एरवी ज्या ट्विटर प्लॅटफॉर्मवरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात, त्याच ट्विटरला आता केंद्र सरकारच्या रोषाला सामोरे जावं लागत आहे. केंद्र सरकारने जारी केलेली सोशल मीडियासाठीची नियमावली पाळण्यात ट्विटरकडून चालढकल केली जात असल्यामुळे केंद्रानं ट्विटरला असलेलं कायद्याचं संरक्षण काढून घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “ट्विटरप्रमाणेच केंद्र सरकार माझ्या सरकारवरही दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे”, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकांचे २ मे रोजी निकाल लागले. मात्र, तेव्हापासून गेल्या दीड महिन्यात केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यामधले संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यास चक्रीवादळानंतर पश्चिम बंगालचा आढावा दौरा केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.

राजकीय हिंसा? ही तर भाजपाची खेळी!

ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांनंतर राजकीय हिंसाचार होत असल्याच्या दाव्यांना फेटाळून लावलं आहे. “पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हिंसाचार होत नाहीये. एखाद-दुसरी घटना घडली असेल. पण त्यांना राजकीय हिंसाचार म्हणता येणार नाही. ही फक्त भाजपाची खेळी असून त्याला कोणताही आधार नाही”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

 

नियम न पाळल्याने भारतातील ट्विटरच्या अडचणीत वाढ

माझ्याही सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न!

ट्विटरवर केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा ममता बॅनर्जी यांनी निषेध केला आहे. “मी या कारवाईचा निषेध करते. केंद्र सरकार ट्विटरला नियंत्रित करू शकत नाही. म्हणून ते ट्विटरला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या कुणाला ते नियंत्रित करू शकत नाहीत, त्यांच्यासोबत ते असंच करत आहेत. ते मलाही नियंत्रित करू शकत नाहीत. म्हणूनच ते माझ्या सरकारला दाबण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

 

Ghaziabad Assault Video: स्वरा भास्कर, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांविरोधात तक्रार दाखल

भारत सरकारच्या नव्या नियमावलीचं पालन न केल्यामुळे केंद्र सरकारने ट्विटरचं संरक्षण काढून घेतलं आहे. त्यामुळे आता यापुढे कोणत्याही बेकायदा मजकुरासाठी ट्विटरवर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई होऊ शकते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2021 5:36 pm

Web Title: west bengal cm mamata banerjee slams bjp covernment on twitter action pmw 88
Next Stories
1 सीरममध्ये जुलै महिन्यात मुलांसाठी Novavax लशीच्या चाचणीस सुरूवात होण्याची शक्यता
2 Kumbh Mela 2021: करोना चाचणी घोटाळा मी शपथ घेण्याच्या आधीचा; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
3 गौतम अदानी यांचे १.१ अब्ज रुपयांचे नुकसान, आशियातील श्रीमंतांच्या यादीतही घसरण
Just Now!
X