News Flash

डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याने नवजात बाळाचा मृत्यू, हतबल वडिलांचा आक्रोश

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवासंपासून वैद्यकीय सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे गेल्या चार दिवासंपासून वैद्यकीय सेवा पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. अनेक रुग्ण ज्यांना तात्काळ उपचाराची गरज आहे, ते विना उपचार रुग्णालयांमध्ये सेवा पुर्ववत होण्याची वाट पाहत बसले आहेत. यादरम्यान, बंगाली वृत्तपत्र आनंदबाजार पत्रिकाच्या फोटोग्राफरने तेथील परिस्थितीचं गांभीर्य दर्शवणारा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोत एक व्यक्ती आपल्या नवजात बाळाचा मृतदेह हातात घेऊन रडत असल्याचं दिसत आहे. फोटोग्राफर दमयंती दत्ता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटला हा फोटो शेअर केला आहे. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. कोलकाता येथील ज्युनिअर डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातली प्रत्येक शासकीय रूग्णालयातले मार्डचे डॉक्टर संपावर गेले आहेत.

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांनी पुकारलेला संप आता देशभरात पसरला असून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि इतर राज्यांमधील रुग्णसेवेला फटका बसला आहे. शुक्रवारी कोलकातामधील फक्त दोन रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी सेवा सुरु होती. तर दिल्लीमधील एम्स रुग्णालयात रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. महाराष्ट्रातील ४५०० डॉक्टर या संपात सहभागी झाले आहेत. यामुळे राज्यातही अनेक ठिकाणी आरोग्यसेवेला फटका बसला आहे.

राज्यातील मार्डचे डॉक्टर संपावर, कोलकाता येथील डॉक्टरच्या मारहाणीचा निषेध

मुख्यमंत्री ममतांच्या अल्टिमेटमनंतरही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच

डॉक्टरांचा संप हा भाजप, माकपचा कट – ममता बॅनर्जी

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) निवासी डॅाक्टर संघटनेच्या सदस्यांनी या आंदोलनास पाठिंबा म्हणुन हेल्मेट घालुन काम करण्याच निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिल्लीतील डॅाक्टर्स हेल्मेट घालुन रूग्णांची तापसणी करत आहेत. तर बंगालमधील जवळपास ४३ डॅाक्टरांनी राजीनामे सोपवले आहेत.

मागण्या पूर्ण होईपर्यंत संपाचा निर्धार
संपकरी कनिष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आदेश धुडकावला असून शासकीय रुग्णालयातील सुरक्षाविषयक मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे.आमच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, आम्ही राज्यपालांशी चर्चा केली आहे, आमच्या मागण्या साध्या आहेत, सर्व रुग्णालयांमध्ये सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा, एनआरएस येथे डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला, त्या आरोपींना अजामीनपात्र तरतुदींनुसार अटक करावी, असे एका संपकरी डॉक्टराने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 4:12 pm

Web Title: west bengal doctors strike mamata banjerjee newborn baby died refused treatment father cries photo sgy 87
Next Stories
1 बंगालमध्ये येणार असाल तर बंगाली भाषा आलीच पाहिजे-ममता बॅनर्जी
2 ‘लश्कर-ए-तैयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3 फोर्ब्सच्या यादीत 57 भारतीय कंपन्यांना स्थान; रिलायन्स 71 व्या क्रमांकावर
Just Now!
X