News Flash

“मोदींना विरोध म्हणजे भारतमातेला विरोध; तुम्हाला मोदींचीच करोना लस घ्यावी लागणार”

"आम्हाला मोदींचं तोंडही बघायचं नाही"

प्रातिनिधिक छायाचित्र/रॉयटर्स

पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विधानसभा निडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी रंगात येऊ लागली आहे. भाजपा विरुद्ध तृणमूल काँग्रेस यांच्यात टीका आणि आरोपांचं घमासान सुरू असून, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य करत आहेत. पूर्व मदिनापूर येथे झालेल्या रॅलीत मोदींचं तोंड बघायचं नाहीये, अशी टीका ममतांनी केली. त्यावर मोदींविरुद्ध बोलणं म्हणजे भारतमातेविरुद्ध बोलणं, असं म्हणत भाजपा नेत्याने प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला पंतप्रधान मोदींचं तोंडही बघायचं नाही, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आज पूर्व मदिनापूर येथे झालेल्या प्रचारसभेत टीका केली. ममतांनी केलेल्या टीकेला पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला करोनाविरुद्ध पंतप्रधान मोदींची लस घ्यावी लागेल. ते (नरेंद्र मोदी) निवडून आलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे लोकशाहीविरुद्ध बोलणं आहे. त्यांच्याविरुद्ध बोलणं म्हणजे भारत मातेविरुद्ध बोलण्यासारखंच आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशकडे लस नाहीये. त्यामुळे तुम्हाला मोदींचीच लस घ्यावी लागणार आहे,” अशी टीका सुवेंदू अधिकारी यांनी ममतांवर केली.

पूर्व मदिनापूरच्या सभेत ममता काय म्हणाल्या?

ममता बॅनर्जी या व्हिलचेअरवरूनच प्रचारात उतरलेल्या आहेत. पूर्व मदिनापूर येथे ममतांनी रॅलीला संबोधित केलं. यावेळी ममता म्हणाल्या,”भाजपाला निरोप द्या. आम्हाला भाजपा नकोय. आम्हाला मोदींचं तोंडही पाहायचं नाही. आम्हाला दंगल, चोर, दुर्योधन, दुःशासन, मीर जाफर नकोय,” असं म्हणत ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 4:21 pm

Web Title: west bengal election 2021 speaking against him is speaking against bharat mata suvendu adhikari mamata banerjee bmh 90
Next Stories
1 अमेरिका विरुद्ध चीन : करोना, तैवान, तिबेट अन् बऱ्याच मुद्द्यांवरुन उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकीत महासत्तांमध्ये जुंपली
2 करोना लसीकरण : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं देशवासीयांना आवाहन!
3 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिजिटल व्यवहारांमध्ये ६७ टक्क्यांनी वाढ
Just Now!
X