देशात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पाच राज्यांच्या निवडणुकांची मोठी चर्चा सुरू होती. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या ठिकाणी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आज लागले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळाला असून केरळमध्ये देखील पुन्हा डाव्यांचीच सत्ता आली आहे. तामिळनाडूमध्ये मात्र सत्तापालट झाला आहे. दुसरीकडे आसाम या छोट्या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजपाला सत्ता राखण्यात यश आलं आहे. ऐन करोनाच्या संकटकाळात देखील जाहीर सभा आणि प्रचार झालेल्या या निवडणुकांत भाजपाला मात्र अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
BJP, Jats, Thakurs, anger of the Jats ,
पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती
Attack on NIA West Bengal
पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर हल्ला; वाहनांची तोडफोड, दोन अधिकारी जखमी
Police-Naxalite encounter on Chhattisgarh border plans of the Naxals to cause an accident were foiled
छत्तीसगड सीमेवर पोलीस-नक्षल चकमक, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात…

या पार्श्वभूमीवर नेमका या पाच राज्यांच्या निवडणुकांचा काय अर्थ आणि अन्वयार्थ आहे? त्याचे देशाच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतील? पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं नेमकं चुकलं कुठे? यावर चर्चा सुरू झाली आहे. याचसंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.