News Flash

प. बंगाल, आसाममध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

आसाममध्ये ४७ मतदारसंघांत  मतदान 

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी ३० मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून ७३ लाखांहून अधिक मतदार १९१ उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत. यापैकी बहुसंख्य मतदारसंघ एके काळी नक्षलग्रस्त असलेल्या जंगल महाल क्षेत्रातील आहेत. त्याचप्रमाणे शनिवारी आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानही होणार आहे.

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून केंद्रीय दलांच्या ६८४ कंपन्या १० हजार २८८ मतदान केंद्रांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणांवर राज्यातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून पुरुलियातील नऊ, बांकुरातील चार, झारग्राममधील चार आणि पश्चिम मेदिनीपूरमधील सहा आणि पूर्व मेदिनीपूरमधील सात जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी २९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. तर काँग्रेस-डावे-आयएसएफ आघाडीने ३० उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

आसाममध्ये ४७ मतदारसंघांत  मतदान

आसाम विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी ४७ मतदारसंघांत मतदान होणार असून राज्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष हितेंद्रनाथ गोस्वामी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा आणि अनेक मंत्र्यांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त होणार आहे.

या ४७ मतदारसंघांपैकी बहुसंख्य मतदारसंघांत सत्तारूढ भाजप-एजीपी आघाडी, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांची महाआघाडी आणि नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जातिया परिषद यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. राज्यात तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. केंद्रीय दले राज्य पोलिसांना मदत करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:18 am

Web Title: west bengal first phase of polling in today abn 97
Next Stories
1 निवडणूक रोखेविक्रीस स्थगिती नाही
2 भारतातील रुग्णसंख्या विस्फोटाने जागतिक लसपुरवठा विस्कळीत
3 नवलखा यांच्या जामिनाबाबत निर्णय राखीव
Just Now!
X