News Flash

पार्कमध्ये एकत्र फिरणाऱ्यांचं जबरदस्तीने लावून दिलं लग्न; मुलाने केली आत्महत्या

या युवकाला आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसलेलं गावातल्या काही नेत्यांनी पाहिलं आणि म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं.

या दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं होतं.

पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या एका गावात एक मुलगा आणि एका मुलीचं काही पंचांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं. तर या लग्नानंतर या युवकाने आत्महत्या केली आहे. हे पंच तृणमूल काँग्रेसचे काही नेते होते.

या गावातल्या २० वर्षीय माणिक मंडल या युवकाला आपल्या मैत्रिणीसोबत बागेत बसलेलं गावातल्या काही नेत्यांनी पाहिलं. त्यानंतर या नेत्यांनी त्या दोघांना सोबत घेतलं आणि पंचायत भरवली. यावेळी सर्व पंचांनी मिळून ठरवलं की या दोघांचं लग्न लावून देण्यात येईल. या दोघांना शिक्षा म्हणून त्यांचं लग्न लावून दिलं होतं.

रविवारी या पंचांनी या दोघांना एका मंदिरात नेलं आणि लग्न लावून दिलं. लग्नानंतर या दोघांनाही या सर्वांनी माणिकच्या घरी सोडलं. घरी माणिकच्या आईने या लग्नाला मान्यता देण्याचं नाकारलं आणि या घटनेला विरोध केला. यावेळी माणिकचे वडील घरी नव्हते.

गावातल्या कोणीही या दोघांचं काहीही ऐकून घेतलं नाही. त्यांना जबरदस्तीने घरी सोडलं. माणिक आणि त्याच्या आईचे वादही याच कारणामुळे झाले. या वादानंतर माणिकने आत्महत्या केली. ही घटना पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातल्या मानकुट बांध भागात घडली. या गावामध्ये तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व आहे. याच पक्षाच्या नेत्यांनी या दोघांचं लग्न लावून दिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मात्र, अद्याप यामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 5:24 pm

Web Title: west bengal panchayat forced youth marriage boy committed suicide punishment love affair vsk 98
Next Stories
1 चीनमध्ये ‘मंकी बी’ व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद; जाणून घ्या या नव्या व्हायरसबद्दल सर्व काही
2 अधिवेशनाच्या एक दिवस आधी पेगॅससचा रिपोर्ट येणं योगायोग तर नाही; IT मंत्र्यांनी व्यक्त केली शंका
3 Pegasus Snoopgate : “ज्यांनी कायम यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर केला, हीच पाळतखोर मंडळी आकांडतांडव करताहेत”
Just Now!
X