27 February 2021

News Flash

भाजपाचा मंत्री आल्यास कार्यक्रमाची परवानगी रद्द करु; शानला पोलिसांची धमकी

गायक शान आणि के के यांचा आसनसोल येथे गाण्याचा कार्यक्रम होता. 'नंबर वन यारी है' असे या कॉन्सर्टचे नाव होते. या कार्यक्रमाला बाबूल सुप्रियो देखील

संग्रहित छायाचित्र

केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी पश्चिम बंगाल पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. बंगाल पोलिसांनी गायक शान आणि के के यांना धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी या कार्यक्रमाला जाणार असल्याने पोलिसांनी शान आणि के के यांना धमकावले आणि बाबूल सुप्रियो आल्यास कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करु असे पोलिसांनी शानला सांगितल्याचे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

गायक शान आणि के के यांचा आसनसोल येथे गाण्याचा कार्यक्रम होता. ‘नंबर वन यारी है’ असे या कॉन्सर्टचे नाव होते. या कार्यक्रमाला बाबूल सुप्रियो देखील जाणार होते. मात्र, शान याने मला फोन करुन पोलिसांनी धमकी दिल्याची माहिती दिल्याचे सुप्रियो यांनी सांगितले. ‘शानने मला संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास फोन केला. पोलिसांनी शानला झोपेतून उठवून कार्यक्रमाला दिलेली परवानगी रद्द करु अशी धमकी दिली. भाजपाचा मंत्री या कार्यक्रमाला आल्यास परवानगी रद्द करु, असे त्यांचे म्हणणे होते, त्यामुळे मी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी शानला सांगितले की बाबूल सुप्रियो आल्यास आम्ही कार्यक्रमस्थळी तैनात केलेला पोलीस बंदोबस्त काढून टाकू. मग सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी तुमची (शान व के के) असेल. हीच लोकशाही आहे का?, असा सवाल सुप्रियो यांनी विचारला. मला या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यात आले असले तरी तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर आहेत, बंगालमध्ये हे काय सुरु आहे?, असे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 11:24 am

Web Title: west bengal police threatened singer shaan alleges bjp mp babul supriyo
Next Stories
1 मोदी-पुतिन बैठकीत एस-४०० करार, पाक दहशतवादाचा मुद्दा अजेंडयावर
2 अन्यायाला वाचा फोडणाऱ्यांनाच नोटीस: तनुश्री दत्ताचा नाना पाटेकरांवर निशाणा
3 सेन्सेक्सची 800 अंकांची पडझड, रुपयाही घरंगळला
Just Now!
X