News Flash

‘बृहन्कोलकाता’मध्ये शहरी मुस्लीम ही ममतांची ताकद

‘बृहन्कोलकाता’मध्ये शनिवारी उत्तर २४ परगणामधील काही मतदारसंघात मतदान झाले.

|| महेश सरलष्कर

पश्चिम बंगालमध्ये हिंदी भाषिकांचा कल भाजपकडे

कोलकाता :  ‘बृहन्कोलकाता’च्या शहरी भागांमधील मुस्लीम मतदार ही तृणमूल काँग्रेसची मोठी ताकद आहे. शहर आणि उपनगरांमध्ये ५७ विधानसभा मतदारसंघ असून गेल्यावेळी ५४  जागा सत्ताधारी पक्षार्ने जिंकल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या बालेकिल्ल्यात प्रवेशाची भाजपला आशा असली तरी बंगार्ली हिंदू मतदारांची ‘मदत’ हा भाजपसाठी कळीचा मुद्दा ठरू लागला आहे.

कोलकाता जिल्हा, शेजारील हावडा, हुगली आणि २४ उत्तर व दक्षिण परगणा अशा पाच जिल्ह्यांतील ‘बृहन्कोलकाता’मध्ये काही मतदारसंघात मुस्लीम प्राबल्य आहे, तिथे भाजर्प जिंकण्याचा प्रश्न येत नाही पण, काही मतदारसंघांत मुस्लिमांची संख्या मोठी असली तरीर्, हिंदीपट्ट्यातील बिहार-उत्तरप्रदेशवासी, मारवाडी आणि बंगार्ली हिदू अशी मिश्र वस्ती आहे. तिथे भाजर्प हिंदू मतांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. सेंट्रल एव्हेन्यू भागातील प्रदेश भाजप कार्यालयातील पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, कोलकाता जिल्ह्यातील भवानीपूर आणि माणिकतल्ला या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपला विजयाची आशा आहे. भवानीपूर हा ममतादीदींचा पूर्वाश्रमीचा मतदारसंघ. इथे बिहारी-उत्तरप्रदेशवासी आणि बंगार्ली हिंदू असे मिश्र मतदार. माणिकतल्लामध्ये मारवाडी समाजाचे प्रभुत्व. या दोन्ही मतदारसंघात मुस्लिमांची संख्या नगण्र्य. हिंदीभाषिक मतदार भाजपच्या बाजूने झुकलेले आहेत. राजेश ठाकूर हा बिहारी म्हणतो की, दीदींनी आमच्यासाठी काही केले नाही. यावेळी मत कमळालाच. भाजपला  जिंकून द्यायचे! भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मते, भाजपला कोलकाताच्या शहरी भागांत शिरकाव करता आलेला नाही. पण, काही मतदारसंघात भाजला जिंकू शकला तर बहुमताची शक्यता असेल.

‘बृहन्कोलकाता’मध्ये शनिवारी उत्तर २४ परगणामधील काही मतदारसंघात मतदान झाले. न्यू टाऊन राजरहाट मतदारसंघ हा त्यापैकी एक. या भागात ‘आयटी एसईझेड’ आहे, इथे आयटी क्षेत्रातील कार्यालये आणि चहूबाजूने त्यांच्या मोठ्या इमारती आहेत. पण, मधोमध झापना नावाची मुस्लीमबहुल वस्ती आहे. इथे सकाळपासून मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. या वस्तीत तृणमूल काँग्रेसचा प्रभाव जाणवत होता. पक्षाच्या प्रभावानुसार झेंडे लटकवलेले असतात. प्रभाव बदलला की झेंडे बदलतात. त्यानुसार पक्षाचे प्रभावक्षेत्र लक्षात येते. या शहरी मुस्लीम वस्त्यांमध्ये तृणमूल काँग्रेसचा प्रभाव जाणवतो. कोलकाता जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. कोलकाता पोर्ट, एंटाली हे पूर्णपणे मुस्लीम विभाग आहेत, तिथे फक्त तृणमूल काँग्रेसचे अस्तित्व दिसते. चौरंगी मतदारसंघात लोहापट्टी, बेलियाघाटामध्ये राजाबाझार, बालीगंजमध्ये पार्क सर्कस हे भाग मुस्लीमबहुल आहेत. इंटाली मतदारसंघातील रेहमान हा तृणमूल काँग्रेसचा मतदार. कोलकातातून दींदीना आव्हान कोणी देऊ शकत नाही, असे त्याचे म्हणणे होते. काँग्रेस आणि माकपचे फारसे अस्तित्व नसल्याने गेल्या दहा वर्षांमध्ये ‘बृहन्कोलकाता’मध्ये शहरी मुस्लिम तृणमूल काँग्रेसचा मतदार बनलेला आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीचा कल कायम राहिला तर तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्लाही कायम राहू शकेल.

बंगाली हिंदूंचा कौल कुणाला?

‘बृहन्कोलकाता’मध्ये हिंदीभाषिक तसेच, मारवाडी मतदारांनी भाजपला कौल दिला, मुस्लीम मतदार तृणमूल काँग्रेसशी एकनिष्ट राहिले तर, बंगार्ली हिंदू मतदारांवर दोन्ही प्रतिस्पर्धी पक्ष अवलंबून असतील. बलाल हा माकपचा समर्थक, मूळे हिंदीभाषिक पण, बहुतांश काळ कोलकातामध्ये गेल्यामुळे बंगालीभाषिकही. त्याचे म्हणणे की, हिंदू बंगाली माकपचे मतदार आहेत, ते माकपलाच मतदान करतील! कोलकाता जिल्ह्यात अखेरच्या दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून बंगाली हिंदू कोणत्या पक्षाला मतदान करणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा भाजप कसोशीने प्रयत्न करत आहे. तृणमूल काँग्रेस पराभूत होऊ शकेल असे हिंदू बंगालींना अजूनही वाटत नसल्याने त्यांच्या मनात साशंकता कायम असल्याचे प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांचेही म्हणणे होते. ‘बृहन्कोलकाता’मध्ये तृणमूल काँग्रेसची संघटना इतर पक्षांच्या तुलनेत मजबूत असल्याने भवानीपूर वा माणिकतल्ला या भाजपला जिंकण्याची आशा असलेल्या मतदारसंघातही तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करणे मोठे आव्हान असल्याचे बलालचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:04 am

Web Title: west bengal the tendency of hindi speakers is towards bjp akp 94
Next Stories
1 इंडियानापोलिस गोळीबारात चार शिखांचा मृत्यू
2 प. बंगाल :  पाचव्या टप्प्यात ७८.३६ टक्के मतदान
3 दीप सिद्धू याला जामिनानंतर पुन्हा अटक
Just Now!
X