पश्चिम बंगालचं नामांतरण करण्याचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेत नामांतरण करत पश्चिम बंगालचं नाव ‘बांग्ला’ असं करण्याचा ठराव ठेवण्यात आला होता. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्तवातील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व भाषांमध्ये हे नामांतरण करण्यात यावं असं ठरावात म्हटलं होतं. हा ठराव मंजूर झाला आहे.

ठराव विधानसभेत मंजूर झाला असल्याने आता गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. गृह मंत्रालयाने ठरावाला मंजुरी दिली तरच पश्चिम बंगालचं ‘बांगला’ असं नामांतरण केलं जाऊ शकतं.

२०१६ मध्येही विधानसभेत पश्चिम बंगालचं नामांतरण करण्याचा ठराव मंजूर झाला होता. या ठरावानुसार पश्चिम बंगालचं नाव बंगालीमध्ये बांगला तसंच हिंदी आणि इंग्लिशमध्ये बंगाल असं करण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यावेळी काँग्रेस, भाजपा आणि डाव्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता.