News Flash

…म्हणून ख्रिस गेल म्हणाला ‘थँक्यू पंतप्रधान मोदी’, भारताच्या जनतेचंही केलं कौतुक; बघा Video

वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने भारत सरकार, भारताची जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार

वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. करोना व्हॅक्सिन वेस्ट इंडिजला पाठवल्यामुळे ख्रिस गेलने आनंद व्यक्त केला असून भारत सरकार, भारताची जनता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय.

गेलने एका व्हिडिओ संदेशाद्वारे भारताचे आभार मानले. जमैकामधील भारतीय दूतावासाने ख्रिस गेलचा १७ सेकंदांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “करोना व्हॅक्सिन दान केल्याबद्दल मी भारत सरकार, पंतप्रधान मोदी आणि भारताच्या जनतेचे खूप आभार मानतो…आम्ही याचं कौतुक करतो….लवकरच भारतात येईल…पुन्हा एकदा व्हॅक्सिनसाठी खूप खूप आभारी आहोत”, असं गेलने म्हटलंय.


गेलने गुरुवारी जमैकात भारतीय उच्चायुक्त आर. मसाकुई यांची दूतावासात जाऊन भेटही घेतली. दरम्यान 8 मार्च रोजी भारत सरकारने जमैकाला अ‍ॅस्ट्राझेनेका व्हॅक्सिनचे ५० हजार डोस पाठवले. त्यानंतर जमैकाच्या पंतप्रधानांनी भारत सरकारचे आभार मानले होते. अत्यंत आवश्यक सहकार्य केल्याबद्दल भारताचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया देत त्यांनी भारताचं आणि भारताच्या जनतेचं कौतुकही केलं होतं. आता गेलनेही भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे व्हॅक्सिनसाठी आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 11:58 am

Web Title: west indies cricketer chris gayle says thank you to pm modi for corona virus vaccines sas 89
Next Stories
1 …तरीही माझा फाटक्या जीन्सला विरोध; टीकेनंतरही तीरथ सिंह रावत विधानावर ठाम
2 फाटकी जीन्स प्रकरण : RSS च्या नेत्यांचा हाफ चड्डीमधील फोटो पोस्ट करत प्रियंका गांधी म्हणाल्या, “अरे देवा…”
3 ‘अझान’मुळे झोपमोड होत असल्याची तक्रार; पोलीस महानिरीक्षकांनी लाऊडस्पीकरवर आणली बंदी
Just Now!
X