पश्चिम घाट संवर्धन कार्यक्रमाची के.कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशीनुसार अंमलबजावणी करताना शेतक ऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे संरक्षणमंत्री ए.के.अँटनी यांनी सांगितले.
कोझिकोड येथील जन रक्षण समितीच्या प्रतिनिधींनी अँटनी यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. समितीच्या नेत्यांनी सांगितले, की अँटनी यांनी सामान्य माणसांना या योजनेची अंमलबजावणी करताना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसचे वायनाड येथील खासदार एम.आय.श्रीनिवास या वेळी बैठकीस उपस्थित होते.  
पश्चिम घाट संवर्धन शिफारशी येत्या काही महिन्यात केरळमधील पर्वतीय क्षेत्रात राबवल्या जात असून त्याच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली होती. अनेक छोटय़ा व मध्यम शेतक ऱ्यांच्या जमिनी या पर्वतीय भागात आहेत त्यामुळे त्यांची रोजीरोटी हिरावली जाण्याचा धोका असल्याने स्थानिक लोकांचा या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास विरोध आहे.