18 September 2020

News Flash

येमेनमध्ये ‘आयसिस’शी संबंधित सात संशयितांना अटक

सरकारने आयसिस आणि अल-कायदाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली

| May 29, 2016 12:03 am

येमेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अडेनमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून सात जणांना अटक केली असून त्यामध्ये एका पाश्चिामात्य मुस्लिमाचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सरकारने आयसिस आणि अल-कायदाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून सात जणांना करण्यात आलेली अटक हा त्याचाच एक भाग आहे. आयसिस आणि अल-कायदाने गेल्या काही महिन्यांत येमेनवर भीषण हल्ले चढविले आहेत. येमेनच्या अधिकाऱ्यांनी आयसिसशी संबंधित सात जणांना एडनच्या मनसुरा जिल्ह्य़ातून अटक केली असून त्यामध्ये एक पाश्चिमात्य मुस्लीम आहे. सरकार समर्थक दले आणि इराण समर्थक बंडखोर यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू असून त्याचा फायदा आयसिस आणि अल-कायदाने उठविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2016 12:03 am

Web Title: westerner among 7 is suspects arrested in yemen
टॅग Isis
Next Stories
1 राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून पी. चिदंबरम यांना उमेदवारी
2 राष्ट्रगीत सुरू असताना फुटीरतावाद्यांशी बोलत होतात का; फारूख अब्दुल्लांवर भाजपची टीका
3 CBSE result : सीबीएसई दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर
Just Now!
X