देशात ऐतिहासिक पाऊल ठरलेला तिहेरी तलाक विरोधी कायदा अर्थात ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्या’तील तरतुदी काय आहेत, जाणून घ्या.

कायद्यातील तरतुदी : 

१) या कायद्यानुसार, मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तलाक-ए-बद्दत अंतर्गत तोंडी, लेखी, ई-मेल अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिहेरी तलाकद्वारे दिलेला घटस्फोट बेकायदेशीर ठरणार आहे.

२) तिहेरी तलाक देणाऱ्या संबंधीत पतीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण देशभरात हा कायदा लागू होणार आहे.

३) नव्या कायद्यानुसार, घटस्फोटित मुस्लिम महिलेला आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पाल्याला तसेच संबंधीत जोडप्याच्या अल्पवयीन मुलांच्या संरक्षण हक्कांतर्गत पतीला निर्वाह भत्ता देणे बंधनकारक असणार आहे.

४) या कायद्यानुसार, मुस्लीम जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या संगोपणासाठी त्यांचा ताबा महिलेकडे असणार आहे.

५) मुस्लिम महिलांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा कायदा वरदान ठरणार आहे.