26 February 2021

News Flash

गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?, प्रियंका गांधींचा सवाल

गुन्हेगार संपला पण...

कुख्यात गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. त्यानंतर आता या चकमकीसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट केले आहे. गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय? असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- ३० वर्षात पाच हत्या, ६२ गुन्हे यूपीचा खतरनाक गँगस्टर विकास दुबे

प्रियंका गांधी काँग्रेसच्या सरचिटणीस असून त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. मागच्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून त्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठया प्रमाणावर सक्रीय आहेत. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळया मुद्दांवरुन योगी सरकारला घेरले आहे.

आणखी वाचा- “कार उलटल्यामुळे सरकार पडण्यापासून वाचलं”; दुबे एन्काउंटर प्रकरणावर नेत्याचा योगींना टोला

काल विकास दुबेला मध्य प्रदेशच्या उज्जैनमधून अटक झाल्यानंतर त्यांनी योगी सरकारवर टिका करणारे टि्वट केले होते. “कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला” असे प्रियंका गांधी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते.

आणखी वाचा- अपघात, पळून जाण्याचा प्रयत्न आणि चकमक; अशा पद्दतीने विकास दुबे झाला ठार

विकास दुबेचा असा झाला खात्मा
कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये खात्मा केला. आठवडयाभरापासून फरार असलेल्या विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैन शहरात अटक करण्यात आली होती. त्याला उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आज कानपूरला घेऊन येत असताना ताफ्यातील एक वाहन पलटी झाले. त्यानंतर विकास दुबे पोलिसाचे शस्त्र हिसकावून पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल यूपी एसटीएफने केलेल्या कारवाईत विकास दुबे ठार झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 10:24 am

Web Title: what happened with those who protect criminals priyanka gandhi dmp 82
Next Stories
1 “कार उलटल्यामुळे सरकार पडण्यापासून वाचलं”; दुबे एन्काउंटर प्रकरणावर नेत्याचा योगींना टोला
2 न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी – प्रियंका चतुर्वेदी
3 करोनाचा उद्रेक; देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
Just Now!
X