28 February 2021

News Flash

चीन-अमेरिकेबरोबरच्या संबंधांवर इम्रान खान म्हणतात…

इम्रान खान सत्ता संभाळल्यानंतर चीन बरोबरच्या संबंधांना विशेष प्राधान्य देणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तसे स्पष्ट केले आहे.

इम्रान खान (संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान सत्ता संभाळल्यानंतर चीन बरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याला विशेष प्राधान्य देणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तसे स्पष्ट केले आहे. सीपीईसी प्रकल्प यशस्वी करण्याबरोबरच चीन बरोबरच संबंध अधिक बळकट, दृढ करण्याचा आपण प्रयत्न करु असे इम्रान यांनी सांगितले. चीनने आपला विकास कसा साधला ते आपल्यासमोर उत्तम उदहारण आहे असे इम्रान म्हणाले.

आपल्यासमोर गरीबी विरोधात लढण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी आपल्याला चीनचे उदहारण घेता येईल. मागच्या ३० वर्षात चीनने ७० कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले. आपल्याला सुद्धा तसेच करायचे आहे. चीनच्या गरीबी निर्मूलनाचा अभ्यास करण्यासाठी मी एक पथक चीनला पाठवणार आहे असे त्यांनी सांगितले.

चीन प्रमाणेच अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्याचाही माझा प्रयत्न असेल पण त्याचा दोन्ही देशांना फायदा झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले. अलीकडच्या काळात पाकिस्तान-अमेरिका संबंध मोठया प्रमाणावर बिघडले आहेत. शेजारच्या अफगाणिस्तानातही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे पाकिस्तानातही शांतता नांदेल असे ते म्हणाले. सौदी अरेबिया पाकिस्तानचा जवळचा मित्र, कठिण काळात नेहमीच पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2018 6:48 pm

Web Title: what imran khan said about china america relation
Next Stories
1 मी पंतप्रधान निवासस्थानात राहणार नाही-इम्रान खान
2 काश्मीर प्रश्न लष्करी मार्गाने नाही तर चर्चेने सुटू शकतो – इम्रान खान
3 मोहम्मद अली जीना यांच्या स्वप्नातला पाकिस्तानात साकारणार – इम्रान खान
Just Now!
X