20 October 2020

News Flash

जाणून घ्या, काय आहे चिदंबरम आरोपी असलेलं एअरसेल मॅक्सिस प्रकरण ?

६०० कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीच्या या प्रकरणात यात मंजुरीबाबत अनियमिततेचे आरोप लावण्यात आले आहेत.

एअरसेल-मॅक्सिस प्रकरण

एअरसेल-मॅक्सिस डील प्रकरण हे 2G स्पेक्ट्रम प्रकरणाशी निगडीत असून ते २००६मध्ये युपीए-१ च्या काळात घडले होते. त्यावेळी पी. चिंदबरम हे अर्थमंत्री होते. या डील प्रकरणात मंजुरीबाबत अनियमिततेचे आरोप चिदंबरम यांच्यावर लावण्यात आले आहेत.

अंमलबजावणी संचालनालायने (ईडी) यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते की, एअरसेलने २००६मध्ये ३५०० कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीसाठी परवानगी मागितली होती. ही परवानगी त्यांना देण्यात आली. मात्र, अर्थमंत्रालयाने ही आकडेवारी कमी करुन दाखवली.

ईडीच्या आरोपांनुसार, अर्थमंत्रालयाने या प्रकरणाला आर्थिक प्रकरणांच्या कॅबिनेट समितीजवळ जाण्यापासून वाचण्यासाठी एअरसेल केवळ १८० कोटी रुपयांच्या एफडीआयची परवानगी मागत होती. त्यावेळच्या नियमांनुसार, ६०० कोटी रुपयांपर्यंतच्या परदेशी गुंतवणुकीला अर्थमंत्री फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या (FIPB) माध्यमांतून मंजूरी देऊ शकत होते.

ईडीचे म्हणणे आहे की, पी. चिंदबरम यांनी ६०० कोटी रुपयांपर्यंत प्रोजेक्ट प्रपोजल्सना मंजुरी देण्याचा अधिकार होता. त्यावरील प्रकल्पांसाठी कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सच्या मंजुरीची आवश्यता होती. मात्र, ही मंजुरी न घेताच याला परवानगी देण्यात आली होती.

या प्रकरणात ऑगस्ट २०१४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात तत्कालीन टेलिकॉम मंत्री दयानिधी मारन, मॅक्सिसचे मालक टी. आनंदा कृष्णन, मारन यांचे बंधू आणि सन नेटवर्कचे प्रमुख कलामिठी मारन यांचा समावेश होता. त्यानंतर आता माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचा नव्या आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 6:15 pm

Web Title: what is chidambarams alleged aircel maxis case
Next Stories
1 नातवंडं खेळवण्याच्या वयात दिला मुलीला जन्म, पण जन्मताच केली हत्या कारण…
2 Aircel-Maxis case : सीबीआयने चिदंबरमनाही केले आरोपी
3 FB बुलेटीन: मराठा समाजाला नोकर भरतीत १६ टक्के आरक्षण आणि अन्य महत्त्वाच्या बातम्या
Just Now!
X