भारतात दाखल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला सपत्नीक भेट दिली. तिथे त्यांनी चरख्यावर सूत कताई केली. त्यानंतर तिथून निघताना आश्रमातील अभिप्राय नोंदवहित त्यांनी ‘माझे जिवलग मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार, अविस्मरणीय भेट’ असा संदेश लिहिला आहे. ट्रम्प यांच्या दोन दिवसाच्या भारत दौऱ्याला सुरुवात झाली आहे. अहमदाबादमध्ये दाखल होताच ट्रम्प प्रथम साबरमती आश्रमात गेले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतात दाखल झाले असून त्यांचा नियोजित दौराही सुरु झाला आहे. सुरुवातीला रोड शो केल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या आणि त्यांचे वास्तव्य असलेल्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प या दाम्पत्याने चरख्यावर सूत कताई देखील केली. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.