News Flash

माहिती न घेताच निधन झाल्याचं ट्विट करणाऱ्यांवर सुमित्रा महाजन संतापल्या; म्हणाल्या….

शशी थरुर यांनी ट्विट करत मागितली जाहीर माफी

संग्रहित (PTI)

लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन गुरुवारी रात्री चर्चेचा विषय ठरल्या होत्या. यामागचं कारण म्हणजे सुमित्रा महाजन यांचं निधन झालं असल्याची बातमी वेगाने पसरली होती. काँग्रेस नेते शशी थरुर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सगळीकडे त्यांच्या निधनाची चर्चा सुरु झाली. फक्त शशी थरुरच नाही तर सुप्रिया सुळे यांच्यासहित अनेकांनी ट्विट केलं होतं. तसंच काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त दिलं होतं. पण नंतर हे वृत्त खोटं असल्याचं लक्षात येताच ट्विट डिलीट करण्यात आले. मात्र यामुळे सुमित्रा महाजन चांगल्याच संतापल्या आहेत.

माझं निधन झाल्याचं जाहीर करण्यात इतकी कसली घाई लागली होती अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. “इंदूर प्रशासनाकडून माहितीची पडताळणी न करताच काही न्यूज चॅनेल माझं निधन झाल्याचं वृत्त कसं काय चालवू शकतात? माझ्या नातेवाईकाने शशी थरुर यांना ट्विटरला वृत्त खोटं असल्याचं सांगितलं. पण पुष्टी करण्याआधीच जाहीर करण्याची इतकी कसली घाई होती?,” अशी विचारणा सुमित्रा महाजन यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याची दखल घ्यावी असं म्हटलं आहे.

दरम्यान शशी थरुर यांनी ट्विट डिलीट करत जाहीर माफी मागितली आहे. आपण सुमित्रा महाजन यांच्या मुलाशी बोलून माफी मागितली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 2:09 pm

Web Title: what was the urgency asks sumitra mahajan on death hoax sgy 87
Next Stories
1 करोनामुळे स्वयंघोषित स्वामी नित्यानंद भयभीत; कैलासात येण्यावर घातले निर्बंध
2 “ऑक्सिजन प्लांट भारतीय लष्कराच्या हाती द्या”, मुख्यमंत्री केजरीवाल यांची पंतप्रधानांना सूचना
3 “दोन कानाखाली लावेन,” आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या तरुणाला भाजपा खासदाराची धमकी
Just Now!
X