News Flash

..आता ‘त्या’ चार राज्यांमध्ये काय होणार?

गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी काँग्रेसला १७, भाजपला १२ जागा मिळाल्या.

कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी ठरल्याचा निकष लावून राज्यपालांनी भाजपला तेथे सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले तोच न्याय गोवा, मणिपूर, मेघालय आणि बिहारमध्ये लावावा, अशी मागणी त्या-त्या राज्यांच्या राज्यपालांकडे सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या पक्षांच्या नेत्यांनी केली.

गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागांपैकी काँग्रेसला १७, भाजपला १२ जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर भाजप, मगोप आणि जीएफपी या पक्षांच्या आघाडीला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण तेथील राज्यपालांनी दिले. मणिपूर आणि मेघालय विधानसभेत प्रत्येकी ६० जागा आहेत. मणिपूरमध्ये काँग्रेसला २८ तर भाजपला २१ जागा मिळाल्या. निवडणूक निकालानंतर झालेल्या आघाडीला राज्यपालांकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले. इतकेच नव्हे तर एका अपक्ष आमदाराला इम्फाळ विमानतळावर सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले आणि भाजपकडे सुपूर्द केले.

मेघालयमध्ये काँग्रेसला २१ तर भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. मात्र निवडणूक निकालानंतर एनपीईपी, यूडीपी, पीडीएफ, एचएसडीपीडीपी यांच्याशी युती आणि त्यानंतर राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागांपैकी सर्वात जास्त म्हणजे ८० जागा राष्ट्रीय जनता दल पक्षाने पटाकाविल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर गोवा, मणिपूर, मेघालय आणि बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष म्हणून काँग्रेस आणि राजदच्या नेत्यांनी संबंधित राज्यपालांकडे सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करण्याचा दावा केला

आहे. कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला निमंत्रित केले. आता या युक्तिवादाच्या आणि काँग्रेस आणि राजदने केलेल्या मागणीच्या पाश्र्वभूमीवर या राज्यांमध्ये काय होणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2018 1:26 am

Web Title: what will happen in goa manipur meghalaya and bihar
Next Stories
1 कर्नाटकातील समंजसपणा काँग्रेसने अन्यत्रही दाखवावा – पवार
2 कर्नाटकातील भाजपच्या पराभवामुळे शिवसेना खूश
3 ..तर ठेकेदारांना बुलडोझरखाली टाकू – गडकरी
Just Now!
X