फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम युझर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जगातील काही भागांमध्ये फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले आहे. व्हॉट्स अॅप हे मेसेंजिगमध्ये लोकप्रिय असलेले अॅप आहे.

या तिन्ही सोशल माध्यमांच्या डेस्कटॉप व्हर्जनचा वापर करताना अडचणी येत असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे तर मोबाइल अॅप वापरताना कोणतीही समस्या जाणवत नसल्याचे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

#FacebookDown हा हॅशटॅग टि्वटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. ९ हजारपेक्षा जास्त लोकांनी फेसबुककडे तक्रार केली. फेसबुकच्या तुलनेत व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्रामवर युझर्सना तितक्य समस्या जाणवल्या नाहीत. युरोप आणि आशियामध्ये मुख्यत्वे ही समस्या जाणवली. युझर्सनी टि्वटरवरुन आपला राग व्यक्त केला.