News Flash

काँग्रेस सत्तेत आल्यास काळे कृषी कायदे रद्द करु – राहुल गांधी

हा सर्व खेळ शेतकऱ्यांची जमीन आणि पैशांसाठी चालला आहे.

देशभरातील शेतकऱ्यांचा विरोध असतानाही केंद्र सरकारने तीन नवे कृषी कायदे आणले आहेत. हे कायदे काँग्रेस सत्तेत आल्यास रद्द करु, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमधील जनतेला दिले आहे. पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसने आयोजित केलेल्या शेती वाचवा यात्रेत ते बोलत होते.

इथल्या शेतकऱ्यांना उद्देशून राहुल गांधी म्हणाले, “मी तुम्हाला खात्री देतो की ज्या दिवशी काँग्रेस पार्टी सत्तेत येईल, आम्ही हे तिन्ही काळे कायदे मोडीत काढू आणि कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ.” या कायद्यांना पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक विरोध असून त्यांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडले आहे.

हा सर्व प्रकार शेतकऱ्यांची जमीन आणि पैशाबाबतचा आहे. पहिल्यांदा मी हा प्रकार भठ्ठा परसौलमध्ये पहिला. जेव्हा यांना पाहिजे तेव्हा ते शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेत होते. आम्ही भूमिअधिग्रहण कायदा बदलला आणि तुमच्या जमीनीचं रक्षण केलं. बाजारा मुल्यापेक्षा चारपट जास्त भाव दिला. मोदी आले आणि त्यांनी आमचा नवा कायदाच बदलून टाकला. शेतकऱ्यांच्या जमीनीसाठी आम्ही संसदेत लढलो होतो. शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

सध्याचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मुठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकारने ती संपवू पाहत आहे. मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिकाही राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 2:57 pm

Web Title: when congress party come to the power we will scrap these three black laws says rahul gandhi aau 85
Next Stories
1 कौतुकास्पद! सोनू सूदने ऑनलाइन अभ्यासातील अडचण दूर करण्यासाठी गावात बसवला मोबाईल टॉवर
2 भारत-चीन सीमा संघर्ष; लडाखमध्ये पुढील आठवड्यात लष्करी पातळीवरील चर्चा
3 माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसीचा भाजपात प्रवेश
Just Now!
X