ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान असताना पाकिस्तानसोबत युद्ध करण्याच्या तयारीत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला. कॅमरून यांनी आपल्या आत्मचरित्रात डॉ. मनमोहन सिंग यांचा संत माणूस असा उल्लेख केला आहे. “मुंबईवरील २६/११ सारखा दहशतवादी भारतात हल्ला पुन्हा झाला असता तर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग पाकिस्तानसोबत युद्ध करणार करणार होते,” असा दावा डेव्हिड कॅमरून यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.

डेव्हिड कॅमरून हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान आहेत. पंतप्रधान असताना त्यांनी २०१० आणि २०१६ मध्ये भारत दौरा केला होता. यशस्वी पंतप्रधान ठरलेल्या कॅमरून यांनी युरोपियन युनियनमधून (ब्रेक्झिट) बाहेर पडण्याच्या मुद्यावरून राजीनामा दिला होता. कॅमरून यांनी नुकतचे ‘फॉर द रेकॉर्ड’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी भारताविषयी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी काही आठवणी सांगितल्या आहेत. विशेष म्हणजे कॅमरून यांनी सिंग यांचा ‘संत माणूस’ असा उल्लेख केला आहे.

मनमोहन सिंग यांच्याविषयी कॅमरून यांनी पुस्तकात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. “पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते संत माणूस आहेत, पण भारतासमोर धोका निर्माण झाल्यानंतर ते कणखर व्हायचे. मुंबईत २६/११चा दहशतवादी झाल्यानंतर मी भारताच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग मला म्हणाले, “भारतात २६/११ सारखा हल्ला पुन्हा झाला तर भारत पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई करेल,” असे कॅमरून यांनी पुस्तकात म्हटले आहे.

भारतीयांचा अभिमान-

ब्रिटनमधील असंख्य उद्योगपती आणि कला क्षेत्रातील व्यक्ती या भारतीय समुदायातील आहेत. प्रिती पटेल, शैलेश वरा, आलोक शमा आणि पौल उप्पल यांसारखे प्रतिनिधी सभागृहात असताना मला त्यांचा अभिमान वाटायचा, असे उद्गार कॅमरून यांनी काढले आहेत.