विजयादशमी म्हणजेच दसऱ्या निमित्त देशवासीयींना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले. तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असं त्यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे.

मोदी म्हणाले, ”जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारत कधी जायचं काय? खरेदी करायची. विशेषता मुलांमध्या याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचे हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुडलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.”

तसेच, आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत होती. मात्र यंदा असे होऊ शकले नाही. पूर्वी दसऱ्याला मोठमोठ्या जत्रा भरत असत. मात्र यंदा त्यांचे स्वरूप देखील वेगळचे आहे. रामलीलाच्या उत्सवाचे देखील मोठे आकर्षण होते. मात्र त्यावर देखील काहीना काही निर्बंध आले आहेत. पूर्वी नवरात्र काळात गुजरातच्या गरब्याचा आवाज सर्वत्र येत होता. मात्र यंदा मोठमोठाले आयोजन सर्व बंद आहेत. आता पुढे आणखी उत्सवं येणार आहेत. ईद, शरद पोर्णिमा, वाल्मिकी जयंती, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, गुरूनानक जयंती आदी उत्सव आहेत. मात्र, करोनाच्या या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचे आहे, मर्यादेतच राहायचे आहे. असेही त्यांनी सांगितले.