अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात चीनने गाव वसवल्याचं धक्कादायक वृत्त समोर आल्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. या नंतर आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

अखेर राहुल गांधी काँग्रेस चीन संदर्भात खोटं बोलणं कधी थांबवणार? असा प्रश्न नड्डा यांनी विचारला आहे. याशिवाय, करोना लस, शेतकरी आंदोलन, एपीएमसी कायद्यावरूनही त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

जेपी नड्डा म्हणाले, “आता जेव्हा राहुल गांधी आपल्या मासिक सुट्टीवरून परतले आहेत, तर मी त्यांना काही प्रश्न विचारू इच्छित आहे. मला अपेक्षा आहे की आजच्या पत्रकारपरिषदेत ते यांची उत्तर देतील. अखेर कधी राहुल गांधी, त्यांचा परिवार आणि काँग्रेस चीनवर खोटं बोलणं थांबणार? ते ही गोष्ट नाकारू शकतात का? की ते ज्याचा उल्लेख करत आहेत. त्या अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरच्या जमीनीला कुणी दुसऱ्याने नाही तर पंडित नेहरू यांनी चीनला भेट म्हणून दिली होती? वेळोवेळी काँग्रेस चीनसमोर आत्मसमर्पण का करते?”

आणखी वाचा- चीनचं धाडस वाढलं! अरुणाचलमध्ये वसवलं गाव; सॅटेलाइट फोटोंमधून आलं समोर

नड्डा यांनी राहुल गांधींना हे देखील विचारले की, “आपल्या ट्रस्टला चीनकडून मिळालेल्या देणग्या परत कराल का?, राहुल गांधींचा चीन आणि त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीबरोबर काँग्रेसच्या कराराला रद्द करण्याचा कोणता विचार आहे का? आपल्या कुटुंबाच्या नियंत्रणात असलेल्या ट्रस्टला चीनकडून मिळालेल्या देणग्या, परत करण्याचा त्यांचा विचार आहे का? किंवा त्यांची धोरणं व आचरण चिनी निधी आणि सामंजस्य करारांनुसार कायम राहतील का? ”

“मैं देश झुकने नहीं दूँगा” आठवतंय का?; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर मोदींवर हल्ला

याशिवाय नड्डा यांनी असा देखील आरोप केला की, “राहुल गांधी यांनी कोविड-19 विरोधातील लढाईत देशाला कमी लेखण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आता जेव्हा भारतात सर्वात कमी रुग्ण आढळत आहेत व आपल्या शास्त्रज्ञांनी लस निर्माण केली आहे, तेव्हा देखील त्यांनी एकदाही शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले नाही व १३० कोटी भारतीयांचे कौतुक का नाही केले?”

तर, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नड्डा म्हणाले, “काँग्रेस शेतकऱ्यांन भडकवण्याचं व भरकटवणं कधी बंद करणार? यूपीएने स्वामीनाथन आयोगाची रिपोर्ट वर्षानुवर्षे का रोखला व एमएसपी का वाढवला नाही. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक दशकं शेतकरी गरिबीतच का राहिला? त्यांना केवळे विरोधी पक्षात असतानाच शेतकऱ्यांचा कळवळा येतो का? असा प्रश्न देखील नड्डा यांनी केला आहे.”