२३६ दिवसांच्या लॉकडाउननंतर बाहेर आलो तर आता २१ दिवसांचा लॉकडाउन सहन करावा लागतो आहे असं म्हणत ओमर अब्दुल्ला यांनी त्यांची व्यथा मांडली आहे. जेव्हा तुम्ही २३६ दिवस लॉकडाउनमध्ये घालवून बाहेर येता तेव्हा सरकार घोषणा करतं की २१ दिवसांसाठी देश लॉकडाउन आहे तेव्हा आणखी एकवीस दिवस? हा विचार करुनच भीती वाटू लागते या आशयाचं ट्विट ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना कलम ३७० रद्द झाल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. सुटका झाल्यानंतर करोनामुळे देशभरात जी स्थिती निर्माण झाली आहे ती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशच लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाबाबत ओमर अब्दुल्ला यांनी हे ट्विट केलं आहे. खरंतर ओमर अब्दुल्ला यांनी याआधी मला कळलं, आपण जीवन मरणाचे युद्ध लढतोय. त्यातून बचावासाठी केंद्र सरकारचे आदेश पाळले पाहिजेत असं आवाहन केलं होतं. मात्र आज त्यांनी २३६ दिवसांच्या लॉकडाउनमधून बाहेर आल्यावर आपल्याला कळतं की २१ दिवस देशच लॉकडाउन आहे तेव्हा ती भावना भीतीदायक असते या आशयाचं ट्विट केलं आहे.