रेल्वे अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही रेल्वे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येतेय. आज पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना भरधाव रेल्वेने उडवल्याने झालेल्या अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये जखमी झालेल्या एका महिलेचा आणि मुलीचा उपचारादरम्यान रूग्णालयात मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या महिलेचा फगवाडामध्ये विवाह झाला होता. दसऱ्यानिमित्ताने ती आपल्या दोन वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी आली होती. माहेरी आल्यानंतर मायलेकी रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्या महिलेला स्वप्नातही अशी दुर्घटना घडेल अशी कल्पना आली नव्हती. पण हा दसऱ्याचा उत्सव तिचा शेवटचा ठरला. या अपघातामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली होती. उपचारासाठी तिला जवळील रूग्णालयात दाखल केले. त्याच रूग्णालयात मृत महिलेच्या वडिलांवर उपचार सुरू होते. दोघांनाही याची कल्पना नव्हती. उपचारादरम्यान मायलेकीचा मृत्यू झाला. त्याच रूग्णालयात मृत झालेल्या मुलीच्या वडिलावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांनंतर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यांना आपल्या मुलीला आणि नातीला शेवटचे भेटता-बोलता आलं नाही. काळाने कुटुंबावर घाला घातला.

या अपघाताला स्थानिक लोकांनी सिद्धू दांपत्य आणि प्रशासनाला कारणीभूत धरले आहे. रावणदहनाचा कार्यक्रम मानावाला आणि फिरोजपूर रेल्वे स्थानकांदरम्यान लोहमार्गाजवळच्या मोकळ्या जागेत सुरू होता आणि तो पाहण्यासाठी सुमारे ३०० लोकांनी गर्दी केली होती. दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्याच्या पोटातील फटाके जोरात वाजू आणि इतस्तत: उडू लागले. त्यामुळेही बरेच लोक लोहमार्गावर अवचितपणे आल्याचे सांगितले जाते. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली. या अपघातामध्ये ६० जणांचा मृत्यू झाला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Where his father and natin broke his father s treatment in the same hospital
First published on: 20-10-2018 at 05:18 IST