News Flash

शिवसेनेच्या लेटरहेडवर म्हणे जारी झाला खोटा व्हिप

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी कालचा व्हिप शिवसेनेचा अधिकृत नसून कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचा दावा केला

लोकसभेमध्ये मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जात असताना शिवसेनेची भूमिका काय आहे यावरून सकाळपर्यंत संभ्रम होता. उद्धव ठाकरेंनी अविश्वास ठरावात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करत तसा आदेश आपल्या खासदारांना दिला व शिवसेना तटस्थ राहील हे स्पष्ट झाले. मात्र, मग आज लोकसभेत सगळ्या शिवसेना खासदारांनी उपस्थित रहायचं असा काल काढण्यात आलेल्या व्हिपचं काय असा प्रश्न उपस्थित झाला.
मात्र शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी तो व्हिप शिवसेनेचा अधिकृत व्हिप नसून कुणीतरी खोडसाळपणा केल्याचे सांगितले. शिवसेनेच्या लेटरहेडवर खोटा व्हिप कसा जारी होऊ शकतो असे विचारले असता त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे खैरे म्हणाले.

शिवसेनेच्या लेटरहेडवर जारी झालेला हा व्हिप. खासदार चंद्रकांत खैरे यांनी हा आपला व्हिप नसून कुणाचातरी खोडसाळपणा असल्याचे म्हटले आहे.

गुरूवारी शिवसेनेच्या लेटरहेडवर असा व्हिप जारी झाला व हा व्हिप सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे शिवसेनेचे खासदार भाजपाच्या बाजुने किंवा विरोधात मतदान करतील असे स्पष्ट झाले होते. मात्र, तो व्हिप आमचा नाहीच अशी भूमिका शिवसेनेने आज घेतली आणि अविश्वास ठरावाच्या कानकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान करून भाजपाला सरळ सरळ विरोध करेल की सत्तेत सहभागी असल्यामुळे अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करत भाजपाच्या साथीनं उभं राहील असा प्रश्न होता. मात्र, ना आपण भाजपाच्या सोबत आहोत ना विरोधात अशी तटस्थ भूमिका या संदर्भात शिवसेनेने घेतलेली बघायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2018 12:31 pm

Web Title: whip on shivsena letterhead was bogus says mp chandrakant khaire
Next Stories
1 No Confidence Motion in Lok sabha : आम्ही केंद्र सरकारसोबत-नितीशकुमार
2 No Confidence Motion in Lok sabha: ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापेक्षा कमी पैसे आंध्रच्या राजधानीसाठी’
3 No Confidence Motion in Lok sabha: सध्या वन डेचा जमाना, टेस्टचा नाही; भाजपाचे काँग्रेसला उत्तर
Just Now!
X