01 June 2020

News Flash

एक चूक झाली नी जगाला कळले डोनाल्ड ट्रम्प यांचे बॅंक डिटेल्स

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेन यांच्याकडून ही चूक झाली

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींची एक चूक झाली आणि सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स समजले. करोना व्हायरसचा कहर जगभरात पसरला आहे. अमेरिकाही त्याला अपवाद नाही. अमेरिकेतही करोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा सगळ्या वातावरणात आता ट्रम्प यांच्या नावाची चर्चा पुन्हा होते आहे. कारण व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरींनी चुकून डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सगळ्या जगाला सांगून टाकले.  व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅकनेनी यांनी करोनासंबंधीची माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्स सांगून टाकले. ही चूक त्यांच्याकडून अनावधानाने झाली.

व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव केली मॅकनेनी या पत्रकाराना करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रम्प यांनी काय काय कामं केली? काय निर्णय घेतले ते सांगत होत्या. त्यावेळी काही दस्तावेज दाखवताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे बँक डिटेल्सही सांगून टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी खात्याचे बँक डिटेल्स यामुळे जगाला समजले. १ लाख डॉलरचा चेक केली मॅकनेनी दाखवत होत्या. त्याचवेळी ट्रम्प यांच्या खासगी खात्याची माहितीही त्यांनी पत्रकारांना दाखवून टाखली.

करोनाच्या संकटापासून वाचण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचं तीन महिन्यांचं वेतन अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाला दिलं आहे. यासंदर्भातच एक लाख डॉलरचा चेक साईन करण्यात आला होता. केली मॅकेनिन यांनी हा चेक दाखवताना ट्रम्प यांच्या खात्याची माहितीही देऊन टाकली. या सगळ्या प्रकारानंतर ट्रम्प सरकारच्या एका अधिकाऱ्याने पत्रकारांवरच राग काढला. ट्रम्प हे त्यांचं तीन महिन्यांचं वेतन हे करोनाशी लढण्यासाठी देत आहेत. ही बातमी महत्त्वाची आहे यापेक्षा त्यांचे बँक डिटेल्स सगळ्यांना समजले यालाच महत्त्व दिलं जातं आहे या गोष्टीला काय अर्थ आहे? असाही प्रश्न या अधिकाऱ्याने विचारला. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:45 pm

Web Title: white house press secretary mistakenly reveals trumps bank details scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 “हे यश नाही तर आमच्या सरकारने केलेली निराशा आहे”, ओमर अब्दुल्लांचं इवांका ट्रम्प यांना उत्तर
2 “राहुल गांधींचा व्हिडीओ म्हणजे निव्वळ नाटक, मजुरांच्या हाल अपेष्टांना काँग्रेसच जबाबदार”
3 “महाराष्ट्रात अन्न मिळालं, पण उत्तर प्रदेशात काहीही दिलं नाही”, स्थलांतरित मजुराने मांडली व्यथा
Just Now!
X