19 January 2020

News Flash

महाभियोग सुनावणीत सहभागी होण्यास व्हाइट हाऊसचा नकार

अतिशय पक्षपाती व घटनाबाह्य़ अशी ही कृती असून देशाच्या इतिहासात इतका अन्याय कुणावर कधी झाला नव्हता.

(संग्रहित छायाचित्र)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची सुनावणी सुरू करण्याच्या प्रतिनिधिगृहाच्या समितीने घेतलेल्या निर्णयानंतर या प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे.

सभागृहाच्या न्याय समितीचे अध्यक्ष जॅरोल्ड नॅडलर यांना पाठवलेल्या पत्रात व्हाइट हाऊसचे वकील पॅट सिपोलोन यांनी म्हटले आहे की, ‘‘डेमोक्रॅटिक पक्षाने अध्यक्षांवर महाभियोग सुनावणी करण्याचे ठरवून अधिकारांचा बेदरकार दुरुपयोग केला आहे. अध्यक्षांवर जी क लमे लावण्यात येत आहेत त्यातून हे दिसून येत आहे. अतिशय पक्षपाती व घटनाबाह्य़ अशी ही कृती असून देशाच्या इतिहासात इतका अन्याय कुणावर कधी झाला नव्हता. निष्पक्षपातीपणा व योग्य प्रक्रियेअभावी सगळी चौकशीच बेकायदा आहे.’’

First Published on December 8, 2019 1:43 am

Web Title: white house refuses to attend impeachment hearing abn 97
Next Stories
1 न्याय ‘तात्काळ’ असू शकत नाही!
2 चर्चेच्या प्रस्तावाला ममतांकडून प्रतिसाद नाही
3 झारखंडमध्ये ६३ टक्के मतदान
Just Now!
X