भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील रोडावत चाललेले आर्थिक संबंध सुधारण्यास तातडीने प्राधान्य द्या आणि भारतातील नव्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करा, अशी विनंती करणारी श्वेतपत्रिका ऑस्ट्रेलिया सरकारकडे पाठविण्यात आली आहे. पंतप्रधान टोनी अ‍ॅब्बॉट यांच्या सप्टेंबर महिन्यातील भारत दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर ही विनंती करण्यात आली आहे. सन २००९ ते २०१३ या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील व्यापार २६ टक्क्य़ांनी रोडावला. त्यामुळे हे संबंध तातडीने सुधारण्याची गरज आहे, आणि अ‍ॅब्बॉट यांचा आगामी दौरा ही त्या दृष्टीने सुवर्णसंधी आहे. ऑस्ट्रेलिया इंडिया बिझनेस कौन्सिल व ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिटय़ूट यांनी ही श्वेतपत्रिका काढली आहे.

महत्त्वाचे मुद्दे
* र्सवकष आर्थिक सहकार्य करारास चालना
* पंतप्रधान मोदी यांचा धोरणीपणा, त्यांचे व्यावसायिक दृष्टिकोन आणि त्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाला भारतात गुंतवणुकीसाठी असलेल्या संधी
* सामरिक आणि राजकीय संबंधात सुधारणा
*  मुक्त व्यापारी क्षेत्र कराराद्वारे भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाला अधिक फायदा मिळविण्याची संधी