19 November 2019

News Flash

महाराष्ट्र संकटात असताना बॉलिवूड कुठंय? विचारणा-यांना बिग बींच उत्तर, म्हणाले…

कौन बनेगा करोडपतीच्या नव्या ११ सिझनच्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झालेली असताना बॉलीवूड सेलिब्रेटिंनी कोणतीही मदत केली नाही, महाराष्ट्राला कर्मभूमी मानणारं बॉलिवूड कुठय? असा प्रश्न विचारणाऱ्यांना महानायक अमिताभ बच्चन यांनी उत्तर दिले आहे. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या ११ सिझनच्या पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य केले आहे.

देशात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीतील पीडितांना अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी पुढे येऊन मदत करीत आहेत. मात्र, ते या गोष्टी बोलून दाखवत नाहीत. त्याचबरोबर मलाही स्वतःला कोणालाही कळू न देता कोणत्याही धर्मादाय संस्थेला मदत करायला आवडेल, असे बच्चन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा करण्यासाठी १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीमध्ये एक मदतकेंद्र सुरु केलं आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी हे मदत केंद्र सुरु करण्यात आलं आहे. ज्यांना कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा आहे, अशांनी या मदत केंद्रांवर जाऊन औषधे, कपडे, धान्य,चादरी,दूध भुकटी,कोरड्या खाण्याची पाकीट असे काही गरजेचे सामान जमा करावे. हे सारं सामान पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने म्हटले होते.

अशा प्रकारे मराठी कलाकारांनी पुढे येऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केल्यानंतर बॉलिवूडकरांवर मात्र महाराष्ट्र संकटात असताना पाठ फिरवल्याचा आरोप अनेकांनी केला होता. असाच प्रश्न अमिताभ बच्चन यांना पत्रकारांनी कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सिझनच्या पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावर असा प्रश्न विचारणाऱ्यांना बच्चन यांनी उत्तर दिले.

First Published on August 13, 2019 9:10 pm

Web Title: who asked where is bollywood when maharashtra is in crisis amitabh bachchn answers to those aau 85
Just Now!
X