02 March 2021

News Flash

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; म्हणाले…

"धन्यवाद नरेंद्र मोदीजी"

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी करोनाविरोधातील भारत देत असलेल्या लढ्याबद्दल कौतुक केलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Covax लस आणण्यासाठी दाखववेली कटिबद्धता आणि जगभरात ती उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्धतेबद्दल ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी स्तुती केली आहे.

ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले आहेत की, “Covax लस तसंच ती जगभरात उपलब्ध करुन देण्यासाठी दाखवलेल्या कटिबद्दततेबद्दल मी नरेंद्र मोदीचे आभार मानतो. जगासाठी करोना महामारी एक मोठं आव्हान असून ती संपवण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्यावर आमचं एकमत झालं आहे”.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांच्यावर फोनवर चर्चा पार पडली. या चर्चेत जागतिक स्तरावर करोनाविरोधात करण्यात येणाऱ्या उपाययोजना, संशोधन आणि पारंपरिक औषधांचा अभ्यास यावर भारत आणि जागतिक आरोग्य संघटनेने एकत्र काम करण्यावर चर्चा झाली. ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ट्विटमध्ये जागतिक आरोग्य तसंच युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजमध्ये भारताच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर करोनाशी लढा देताना जागतिक आरोग्य संघटनेचं महत्व अधोरेखित केलं. पीएमओकडून यासंबंधी निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं. नरेंद्र मोदींनी चर्चेदरम्यान करोनाशी लढा देताना इतर रोगांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये याकडे लक्ष वेधताना जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळात असलेल्या पाठिंब्याचं महत्व सांगत कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांना भारत १३ नोव्हेंबर रोजी भारतात आयुर्वेद दिवस साजरा करण्याची योजना आखत असल्याची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:37 pm

Web Title: who chief tedros adhanom ghebreyesus hails pm narendra modi for commitment to coronavirus vaccine covax sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उमा भारती म्हणाल्या, “तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; परंतु…”
2 अमेरिकेत काय होणार? ट्रम्पनी दिले बंडाचे संकेत, पेंटागॉनच्या नेतृत्वात केला बदल
3 ISIS च्या दहशतवाद्यांनी ५० जणांचा शिरच्छेद करुन संपूर्ण गाव जाळलं; महिलांना बनवलं Sex Slaves
Just Now!
X