26 November 2020

News Flash

ज्याच्याकडे ५६ इंची छाती, तोच करु शकतो गरीबांची सेवा – जे. पी. नड्डा

बिहारमध्ये प्रचाराचा करंट वाढला

संग्रहित (PTI)

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. यापूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यानुसार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची रोहतास येथे आज सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच गरिबांचे तारणहार आहेत असा सूर लावला.

नड्डा म्हणाले, “राजकारणात घोषणाबाजी आणि भाषणबाजी करणं सोप आहे. मात्र, गरीब जनतेची सेवा तोच करु शकतो ज्याची ५६ इंचाची छाती असते.” नड्डा यांनी बिहारमध्ये आठवड्याभरात चार निवडणूक सभा घेतल्या आहेत. उद्या बिहारमध्ये त्यांच्या दोन ठिकाणी सभा होणार आहेत.

दरम्यान, कालच केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे. नित्यानंद राय यांनी बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचा (आरजेडी) विजय झाल्यास दहशतवादी बिहारमध्ये आश्रय घेतील, अशी भीती व्यक्त केली आहे. प्रचारसभेतील त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ १२ ऑक्टोबरचा आहे. या व्हिडीओत नित्यानंद राय जेडीयूचे उमेदवार उमेश कुशवाहा यांच्या प्रचारसभेसाठी उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 4:09 pm

Web Title: who has a 56 inch chest can serve the poor says j p nadda aau 85
Next Stories
1 आयटी इंजिनिअर्ससाठी गुड न्यूज! टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोमध्ये महाभरती
2 “भगतसिंह कोश्यारी धर्मनिरपेक्ष आहेत ना? हे पंतप्रधानांनी तपासण्याची गरज”
3 मोठी बातमी! तीन महिन्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती; BARC चा निर्णय
Just Now!
X