28 February 2021

News Flash

देशात ज्या २१ वर्षाच्या मुलीची चर्चा आहे, ती दिशा रवी कोण आहे?

केजरीवालांपासून अन्य नेते जिच्या अटकेचा विरोध करतायत, ती दिशा रवी आहे तरी कोण?

(दिशा रवी हिचं संग्रहित छायाचित्र)

पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या २१ वर्षीय दिशा रवीच्या अटकेनंतर सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी दिशा रवीच्या अटकेला विरोध केला आहे. ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरुन दिशाला शनिवारी बंगळुरुमधूनअटक करण्यात आली.

दिशावर काय आरोप आहे ?

दिशा रवी ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ची संपादक आहे. ‘टूलकिट गूगल डॉक्युमेंट’ बनवण्यात व त्याचा प्रसार करण्याच्या कारस्थानात तिची मुख्य भूमिका आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे टूलकिट बनवण्यात आले होते. ग्रेटा थनबर्गने सुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना हे टूलकिट शेअर केले होते.

या ‘टूलकिट’मधील माहिती ‘पोएटिक जस्टिस फाऊंडेशन’ या खलिस्तान समर्थक गटाशी संबंधित असल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले होते. दिशा रवीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिशा रवीला झालेली अटक हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- समजून घ्या : टूलकिट म्हणजे काय? ते कशासाठी आणि कसं वापरतात?

कोण आहे दिशा रवी ?

– दिशा रवीने बंगळुरुच्या खासगी कॉलेजमधून बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली आहे.

– पर्यावरण कार्यकर्ती असणारी २१ वर्षीय दिशा रवी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ या ग्रुपची संस्थापक सदस्य आहे.

– ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ ही ऑगस्ट २०१८ मध्ये सुरु झालेली एक चळवळ आहे. ग्रेटा थनबर्गने पर्यावरण बदलाच्या विषयावर आंदोलन सुरु करुन, जगाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्याकडे वेधले, त्यावेळी ‘फ्रायडेज फॉर फ्युचर इंडिया’ ही चळवळ सुरु झाली.

– माझ्या आजी-आजोबांकडे पाहून मला पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे दिशाने मुलाखतीत सांगितले होते. माझे आजी-आजोबा शेतकरी होते, पर्यावरणातील बदलांमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांमुळे त्यांना संघर्ष करताना मी पाहिले आहे.

– पर्यावरण बदलाचा शेतीवर विपरित परिणाम होतोय, याची त्यावेळी मला कल्पना नव्हती. कारण मी जिथून येते, तिथे पर्यावरण शिक्षणाची व्यवस्थाच नव्हती. ज्यावेळी मी रिसर्च केला, त्यावेळी मला या बद्दल समजले. दरदिवशी लाखो लोकांवर पर्यावरण बदलाचा परिणाम होतोय, पण कोणीही त्याबद्दल काहीही बोलत नाही. मला ते बदलायचे होते. मला घराघरात या विषयावर चर्चा घडवून आणायची होती असे तिने मुलाखतीत सांगितले होते.

– वनस्पति आधारीत अन्न-पदार्थ बनवणाऱ्या कंपनी सोबत सुद्धा दिशा रवी काम करते. या कंपनीचे अन्नपदार्थ परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 2:37 pm

Web Title: who is disha ravi climate activist arrested in greta thunberg toolkit case dmp 82
Next Stories
1 करोनानंतर आता इबोला महामारी… ‘या’ देशामध्ये चार जणांचा झाला मृत्यू; सतर्कतेचा इशारा जारी
2 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी करोना पॉझिटिव्ह
3 टर्की काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या तयारीत; पाकिस्तानसोबत भारताविरुद्ध रचला मोठा कट
Just Now!
X