News Flash

कोण आहेत आसामचे नवे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा?

हेमंत बिस्वा शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ

आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत खलबतं सुरु होती. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम लागला असून हेमंत बिस्वा शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. हेमंत बिस्वा शर्मा लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्याचा गाडा हाकणार आहेत.

हेमंत बिस्वा शर्मा यांनी २०१५ साली काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश घेतला. त्यांनी पक्षात प्रवेश केल्यानंतर आसाममध्ये भाजपाची ताकद चांगलीच वाढली. २०१६च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे २०१६ च्या विधानसभा निकालानंतर हेमंत बिस्वा शर्मा यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत होतं. मात्र सर्बानंद सोनोवाल यांची निवड करण्यात आली होती. २०१६ च्या विधानसभेत त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. त्यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी सीएए आणि करोना स्थिती हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची नवी आघाडी तयार करण्याची गरज – संजय राऊत

हेमंत बिस्वा शर्मा यांनी दुसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आसामच्या बागपत जिल्ह्यातील जालुकबारी विधानसभेतून सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. हेमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसच्या रामेन चंद्र बोरठाकुर यांच्यापेक्षा १,०१,९११ अधिक मतं मिळवत विजय मिळवला. या विधानसभेसाठी एकूण ७७ टक्के मतदान झालं होतं.

नागपूर : फळ विक्रेता डॉक्टर बनून कोविड रुग्णांवर करत होता उपचार

हेमंत बिस्वा शर्मा यांचा जन्म १ फेब्रुवारी १९६९ रोजी झाला. हेमंत बिस्वा शर्मा यांनी कामरुप अकादमीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर कॉटन कॉलेज गुवाहटीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली आणि गुवाहटी कॉलेजमधून पीएचडी केली. पाच वर्ष त्यांनी गुवाहटी न्यायालयात वकिली केली. त्यानंतर २००१ ते २०१५ या कालावधीत काँग्रेसकडून निवडणूक लढवली. आसामच्या जलकुबारी विधानसभेतून ते तीन वेळा निवडून आले. त्यानंतर २०१६ आणि २०२१ या विधानसभा निवडणुकीत ते दोनदा भाजपाच्या तिकीटावर जिंकले. त्यांचा दांडगा जनसंपर्क पाहता भाजपाने त्यांना नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्सचं प्रमुख पद दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 3:02 pm

Web Title: who is himanta biswa sarma elected as a cm of aasam rmt 84
टॅग : Bjp,आसाम
Next Stories
1 हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री; सोनोवाल पुन्हा दिल्लीत जाणार?
2 ‘या’ ४ राज्यांतील करोना स्थितीचा पंतप्रधान मोदींकडून आढावा
3 “बलात्कार करण्याएवढी जागा SUV मध्ये असते का?” पोलिसांची RTO कडे विचारणा!
Just Now!
X