News Flash

मोदींनी उल्लेख केलेले ब्राझिलचे Jonas Masetti उर्फ ‘विश्वनाथ’ कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर

मसेटी जोनास यांनी मॅकेनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर स्टॉक मार्टेक कंपनीमध्ये काम करत होते...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रेडिओवरुन आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये एका खास व्यक्तीचा उल्लेख केला. भारताची संस्कृती आणि शास्त्र-पुराणे सर्व जगासाठी आकर्षणाचं केंद्र असल्याचं सांगत मोदींनी ब्राझिलच्या जोनास मसेटी (Jonas Masetti) यांच्याबाबत विशेष माहिती दिली.

भारतात चार वर्षांचा कालावधी घालवल्यानंतर मसेटी हे आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेदांचे महत्त्व जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायेत. कार्यक्रमात मोदी म्हणाले की, “काही लोक भारतीय संस्कृती, शास्त्र-पुराणे आणि वेदांच्या शोधात भारतात आले आणि सर्व जीवनासाठी इथलेच झाले. तर काही भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणून त्यांच्या देशात परतले. मला जोनास मसेटी यांच्या कार्याबाबत समजलं, त्यांना विश्वनाथही म्हटलं जातं. ते ब्राझिलमध्ये भगवद् गीता आणि वेदांचं शिक्षण देतात”.


कोण आहेत Jonas Masetti ?
मसेटी जोनास यांनी मॅकेनिकल इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर स्टॉक मार्टेक कंपनीमध्ये काम करत होते. पण, त्यानंतर त्यांचा रस भारतीय संस्कृती आणि खासकरुन वेदांमध्ये निर्माण होत गेला. त्यांनी कोइंबतुरच्या अर्श विद्या गुरूकुलममध्ये चार वर्ष वेदांचं शिक्षण घेतलं. जोनास यांना भारतीय संस्कृती इतकी भावली की त्यांनी आपला पूर्णवेळ अध्यात्मासाठी देण्याचा निर्णय घेतला. ते ब्राझिलमध्ये विश्वविद्या नावाची संघटना चालवत आहेत. आपल्या ऑनलाइन कोर्सद्वारे गेल्या ७ वर्षांमध्ये जोनास लाखो जणांना वेदांचं शिक्षण देत आहेत. ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही त्यांचे ३४ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून तिथेही ते भारतीय संस्कृतीचे आणि वेदांचे धडे देत असतात. जॉनस याच्या या प्रवासाला पंतप्रधान मोदी यांनी अनुकरणीय म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 9:57 am

Web Title: who is jonas masetti or vishvanath the brazilian man praised by pm modi in mann ki baat sas 89
Next Stories
1 Coronavirus : देशभरात २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे करोनाबाधित, ४४३ रुग्णांचा मृत्यू
2 राहुल गांधी म्हणतात, “अब होगी किसान की बात…”
3 भाजपा आमदार किरण माहेश्वरी यांचे करोनामुळे निधन
Just Now!
X