News Flash

WHO च्या नकाशात जम्मू-काश्मीर, लडाख भारतापासून वेगळे; सरकारने नोंदवला आक्षेप

नकाशात झालेली चूक तातडीने बदलण्याची मागणी

( File Photo - Reuters )

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्याप्रकरणी भारत सरकारने आता कडक भूमिका घेतली आहे. WHO च्या वेबसाइटवरील भारताच्या नाकाशात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन भूभाग भारतापासून वेगळे दर्शवण्यात आले होते. यावरुन भारताने जागतिक आरोग्य संघटनेनेकडे नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवला आहे.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी WHO चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अधनोम घेब्रेसेस यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित केला असून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भारताच्या नकाशात झालेली चूक तातडीने बदलण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. भारताने WHO समोर एका महिन्यात तिसऱ्यांदा हा मुद्दा उपस्थित केलाय.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपल्या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या नकाशात भारतीय भूभाग हा गडद निळ्या रंगात दर्शवण्यात आलाय. तर जम्मू-काश्मीर आणि लडाखचा भाग राखाडी रंगात दाखवण्यात आला. यावरुन वादंग निर्माण झाल्यानंतर आता भारताने WHO समोर आक्षेप नोंदवला आहे. उल्लेखनीय म्हणजे सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे डब्ल्यूएचओच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 2:13 pm

Web Title: who map shows jk ladakh separate from india government protests against inaccurate depiction sas 89
Next Stories
1 नव्या कृषी कायद्यांसाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मोदी सरकारचं कौतुक; म्हणाले…
2 Made in China लसीचा ब्राझीलला दणका, भारतात लसीसाठी विमान पाठवण्याची तयारी; पण मोदी सरकार म्हणालं…
3 इंडोनेशियात भूकंप : रुग्णालयाची इमारत कोसळली, अनेक रुग्ण आणि कर्मचारी अडकल्याची भीती
Just Now!
X