22 January 2021

News Flash

करोना व्हायरसच्या उत्पत्तीचा शोध लागणार, WHO ची विशेष टीम वुहानमध्ये दाखल

हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय?

संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाऱ्या करोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे. जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणाऱ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे.

कामाला सुरुवात करण्याआधी दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. करोना व्हायरसची उत्पत्ती कशा झाली? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्राण्यांमधून या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केलाय, तर काहींच्या मते हे मानवनिर्मिती संकट आहे. त्यासाठी वुहानमधल्या प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते.

करोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने फोफावला. आधीच या व्हायरसचे मूळ शोधण्याला बराच विलंब झाला आहे.

चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतेय

WHO ची टीम चीनमध्ये दाखल झालेली असताना, तिथे पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढतेय. उत्तर चीनमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढतेय. चीनने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्ण संख्या वाढतेय. एका प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:51 pm

Web Title: who team arrives in wuhan as china reports first virus death dmp 82
Next Stories
1 “१५ वर्षांची मुलगीही आई होऊ शकते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय?”
2 एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची नोंदणी; मतदार यादीमध्ये चमत्कारिक घोळ
3 ब्रिटन : करोना रुग्णांना हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये शिफ्ट करणार
Just Now!
X