जगभरात दर दहामाणसांमागे एक व्यक्ती करोना व्हायरसने बाधित झाला असावा, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे.

WHO च्या ३४ सदस्यांच्या बोर्डाच्या बैठकीत सोमवारी ते बोलत होते. “विविध वयोगट, शहरी ते ग्रामीण भागात आकडे भिन्न असू शकतात. पण जगातील मोठया लोकसंख्येला करोनापासून धोका कायम आहे” असे रायन म्हणाले.

भारतात दररोज वाढतेय करोना रुग्णांची संख्या
देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप वाढतच आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ६६ लाखांचा टप्पा देखील ओलाडंला आहे. मागील चोवीस तासांमध्ये देशभरात ७४ हजार ४४२ नवे करोनाबाधित आढळले. तर, ९०३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ६६ लाख २३ हजार ८१६ वर पोहचली आहे.

देशभरातील एकूण ६६ लाख २३ हजार ८१६ करोनाबाधितांमध्ये ९ लाख ३४ हजार ४२७ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ५५ लाख ८६ हजार ७०४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख २ हजार ६८५ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.