28 September 2020

News Flash

CAA : विरोध दर्शवण्यासाठी ओवैसींनी केले ‘हे’ आवाहन

सुधारित नागरिकत्व कायद्यामधून धर्म हटवण्याची मागणी असल्याचेही सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी रात्री उशीरा हैदराबादेतील दारुस्सलाम येथे सभा घेतली. सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ओवैसींनी मार्गदर्शन करताना, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. याचवेळी त्यांनी उपस्थितांसह समस्त देशवासीयांना उद्देशून सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात असल्याचा भाजपाला संदेश देण्यासाठी, सर्वांनी आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी औवेसी म्हणाले की, नागरिकांनी आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) चा विरोध दर्शवावा. लोकांवर गोळीबार केला जात आहे, हे चुकीचे आहे. मी केवळ सुधारित नागरिकत्व कायद्यामधून धर्म हटवण्याची मागणी करत आहे. तर नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर व एनआरसी काळा कायदा आहे. पंतप्रधान मोदी यांना माहिती आहे की, आपली अर्थव्यवस्था खराब अवस्थेत आहे. मात्र ते जीडीपी आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोलणार नाहीत.

आपल्या घरांवर तिरंगा असणं हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपासाठी संदेश असेल की, महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आणि राज्यघटना अद्याप अस्तित्वात आहे. ही मुस्लिमांची लढाई नाही व या लढाईत एकटे मुस्लीम नाहीत. ही देशाला वाचवण्याची लढाई आहे. पंतप्रधान मोदी देशाला धर्माच्या नावावर चालवू इच्छित आहेत. अफगाणिस्तान,पाकिस्तान आणि बांगलादेश येथून येणाऱ्या लोकांना नागरिकत्व देण्याबद्दल आम्हाला अडचण नाही, मात्र हे केवळ धर्माच्या आधारावरच का? असा सवालही ओवैसी यांनी याप्रंसगी विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 10:57 am

Web Title: whoever is against the nrc and caa should fly tricolour outside their homes owaisi msr 87
Next Stories
1 ‘मुंबई ते अहमदाबाद’ दुसरी ‘तेजस’, कसं असेल वेळापत्रक?
2 महिलांचा अवमान केल्याचा आरोप, शशी थरूर यांच्याविरोधात अटक वॉरंट
3 दिल्लीत आज मोदींची सभा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था; CAA मुद्द्यावर काय बोलणार?
Just Now!
X