News Flash

बहुतांश राज्यात सत्ता असतानाही पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यात भाजपाला अडचण काय?, काँग्रेसचा सवाल

केंद्रासह देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपाचीच सत्ता आहे. मग केंद्र सरकार जीएसटीचा मुद्दा राज्य सरकारांवर का ढकलत आहे? जीएसटीसाठी मंजूरी मिळवणे त्यांना अवघड नाही.

Narendra Modi , P. Chidambaram , Narendra Modi , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
पी. चिदंबरम

जीएसटीच्या कक्षेत आणल्यानंतर गगनाला भिडलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आपोआप कमी होतील. मात्र, केंद्रासह बहुतांश राज्यांत भाजपाची सत्ता असतानाही ते याबाबत निर्णय का घेत नाहीत?, असा सवाल माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला केला.


चिदंबरम म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्याचबरोबर देशातील बहुतांश राज्यांमध्ये देखील त्यांचीच सत्ता आहे. मग केंद्र सरकार जीएसटीचा मुद्दा राज्य सरकारांवर का ढकलत आहे? जीएसटीसाठी मंजूरी मिळवणे त्यांना अवघड नाही. मग, या गोष्टीला उशीर कशासाठी होतोय.

मे-जून २०१४ मध्ये पेट्रोल, डीझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती ज्या होत्या त्यापेक्षा आजच्या किंमती अधिक का आहेत? या वाढणाऱ्या किंमतींमागे कुठलेही मोठे कारण नाही. यावरुन पेट्रोल-डिझेलच्या किंमती कृत्रिमरित्या वाढवल्या जात असल्याचे सिद्ध होते. यावरुन लोक मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत, असे चिदंबरम म्हणाले.

भाजपा सरकारवर टीका करताना चिदंबरम म्हणाले की, सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती म्हणजे अन्य काही नाही तर असहाय्य जनतेला लुटण्याचा प्रकार सुरु आहे. पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणल्यास याच्या किंमती आपोआप कमी होतील, मग भाजपा सरकार हे का करीत नाही?

त्याचबरोबर त्यांनी रेपो रेट वाढवण्यावरूनही त्यांनी सरकारला प्रश्न विचारले आहेत. त्यांनी विचारले की, महागाईचा दर वेगाने वाढत आहे. मात्र, रेपो रेट वाढवण्यात आल्याने व्याजदर देखील वाढवण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम ग्राहक आणि उत्पादकांवर होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2018 1:43 pm

Web Title: why are they blaming states on bring petrol diesel under gst they have a majority they should do it says chidambaram
Next Stories
1 १०० पैकी केवळ एकाला भेदता येते JEE Exam (Advance)
2 …तर चंदा कोचर यांना दंड म्हणून भरावे लागणार २५ कोटी रुपये
3 पाकिस्तानातील दहशतवादी संघटना मिळून घडवताहेत भारतावर हल्ले, दहशतवाद्याचा खुलासा
Just Now!
X