08 July 2020

News Flash

तुम्हाला इतका उशीर का? सर्वोच्च न्यायालयाचा राकेश अस्थानांच्या वकिलांना सवाल

सीबीआयमधील नंबर २ अधिकारी राकेश अस्थाना यांनी शेवटच्या मिनिटाला दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

Rakesh Asthana: अस्थाना हे १९८४च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर होते.

सीबीआयमधील नंबर २ अधिकारी राकेश अस्थाना यांनी शेवटच्या मिनिटाला दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आलोक वर्मा यांच्या प्रमाणेच त्यांनी सुद्धा सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सीबीआयमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धामुळे केंद्र सरकारने मंगळवारी विशेष सीबीआय संचालक राकेश अस्थाना आणि आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

तुम्हाला इतका उशीर का झाला ? आमच्यासमोर जे प्रकरण सूचीबद्ध नाहीय त्यावर आम्ही सुनावणी करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी वरिष्ठ वकिल मुकुल रोहतगी यांना सांगितले. ते अस्थाना यांची बाजू मांडणार आहेत. आम्ही स्वतंत्र याचिका दाखल करतोय असे रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

आलोक वर्मांचीच नव्हे तर राकेश अस्थानांवरही आरोप आहेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने आम्ही फक्त आलोक वर्मा यांच्यासंबंधी बोलत आहोत असे सांगितले. वर्मा आणि अस्थाना दोघांनी परस्परांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वर्मा यांनी अस्थानांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांची चौकशी सुरु केली. सीबीआयमधील या अंतर्गत गृहयुद्धाने टोक गाठल्याने सरकारने दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले.

दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी महत्वपूर्ण आदेश दिला. सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल. सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांना धोरणात्मक निर्णय घेण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने रोखले आहे. त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2018 2:39 pm

Web Title: why are you so late supreme court refuse to hear rakesh asthana plea
टॅग Supreme Court
Next Stories
1 CBI vs CBI : दक्षता आयोगाच्या चौकशीबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सकारात्मक – अरुण जेटली
2 POLL: ५८ टक्के लोकं म्हणतात, ‘होय, CBI अधिकाऱ्यांची बदली राफेलला घाबरूनच’
3 इम्रान खान सरकारने हाफिज सईदच्या संघटनेला दहशतवाद्यांच्या यादीतून वगळलं
Just Now!
X