News Flash

गुजरातमध्ये महिलांना न्याय का मिळत नाही, राहुल गांधींचा मोदींना सवाल

मोदींनी महिलांना खोटे आश्वासन दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी

गुजरातमधील महिलांना न्याय का मिळत नाही, असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. गुजरातमध्ये महिलांविरोधात वाढत असलेले गुन्हे, त्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि शिक्षणाच्या स्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. मोदींनी महिलांना खोटे आश्वासन दिल्याचा आरोप त्यांनी केला. गुजरातमध्ये भाजप २२ वर्षांपासून सत्तेवर आहे पण येथील महिलांविरोधातील गुन्ह्याप्रकरणी शिक्षेचा दर फक्त तीन टक्के इतकाच असल्याचे आकडेवारीसह स्पष्ट केले. गुजरात मानव तस्करीत तिसरा, महिलांवर अॅसिड हल्ल्याप्रकरणी पाचवा आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कारप्रकरणी दहाव्या स्थानी असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते रोज एक प्रश्न मोदींना विचारत आहेत. आज त्यांनी आपला पाचवा प्रश्न मोदींना विचारला.

राज्यातील महिलांचा साक्षरता दर २००१ मध्ये ७० टक्के होता. तो घटून २०११ मध्ये ५७ टक्केवर कसा आला. मोदी ऑक्टोबर २००१ ते मे २०१४ पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, महिलांना न्याय का मिळत नाही. महिलांवरील अत्याचार प्रकरणातील फक्त ३ टक्के आरोपींनाच शिक्षा होते. अहमदाबाद आणि सुरत सारख्या सर्वांत महत्वपूर्ण शहरातच महिलांवर जास्त अन्याय होतो. याप्रकरणी हे दोन्ही शहरे दहाव्या स्थानी आहेत. बालशिक्षणाप्रकरणी गुजरात २० व्या स्थानी आहे, अशी माहिती त्यांनी दिली. राहुल गांधी हे ९ डिसेंबर पर्यंत म्हणजे विधानसभा निवडणुका होईपर्यंत मोदींना रोज एक प्रश्न विचारणार आहेत.

त्यांनी पंतप्रधानांना राज्यातील महिलांच्या आरोग्याबाबत विचारले. राज्यातील मातृ मृत्यू दरात वाढ होऊन ती ८५ टक्के इतकी झाली आहे. राज्यातील नवजात मुलांच्या ६७ टक्के माता सरकारी अॅम्ब्युलन्सकडून निशूल्क परिवहन सुविधांपासून वंचित का आहेत, असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2017 6:10 pm

Web Title: why do women not get justice in gujarat rahul gandhi questions pm narendra modi
Next Stories
1 शिवभक्त असणाऱ्या राहुल गांधींचा भगवान रामावर विश्वास आहे का?; मीनाक्षी लेखींचा सवाल
2 पाकिस्तानकडून यावर्षी ७२० वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन
3 दिल्लीतील प्रदूषणामुळे श्रीलंकन गोलंदाजाला लागली धाप; खेळ थांबवण्याची मागणी
Just Now!
X