News Flash

हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, योगी आदित्यनाथ यांची गर्जना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मल्काजगिरीमधे रोड शो

संग्रहीत छायाचित्र

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
“मला काही लोकांनी विचारलं की हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? मी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 8:31 pm

Web Title: why hyderabad cant be renamed as bhagyanagar ask up cm yogi adityanath scj 81
Next Stories
1 Coronavirus : या लढाईत शेजारी देशांसोबत अन्य देशांनाही सहकार्य करणं आपलं कर्तव्य – पंतप्रधान
2 मोदी सरकारने जवानांनाच शेतकऱ्यांच्या विरोधात उभं केलं-राहुल गांधी
3 मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या राजकीय सचिवाने केला आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X