News Flash

“भारत का मागे हटला?”; चीन सीमावादावरून काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

ही अत्यंत दुःखद बाब आहे.

गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर भारत-चीन सीमेवरील तणाव चर्चेनंतर हळूहळू निवळताना दिसत आहे. भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीनचे सैन्य पूर्व लडाखच्या काही भागातून परस्पर सहमतीने दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहे. सीमेवरील सैन्य माघारीवरून काँग्रेसनं मोदी सरकारला सवाल केला आहे.

भारत-चीनमधील लष्करी आणि राजनैतिक चर्चेनंतर सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर हाँट स्प्रिंगमधील पेट्रोल पॉईंट १५ येथे सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गोग्रामध्ये पेट्रोल पॉईंट १७ जवळ दोन किलोमीटरपर्यंत सैन्य माघारीची प्रक्रिया उद्या किंवा परवापर्यंत पूर्ण होईल. पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्रात फिंगर फोरमध्येही चिनी सैन्याच्या हालचाली सुरु आहेत. तिथून सैन्य वाहने आणि तंबू चीनने हटवला आहे.

सैन्य मागे घेतल्यानंतर काँग्रेसनं मोदी सरकारकडे प्रश्न उपस्थित केला आहे. “ज्या भागांमध्ये कधीच चीनसोबत वाद झाला नाही. ज्या भागांवर चीननं कधीही कोणता दावा केला नाही. ते क्षेत्रच सीमावादाचा भाग बनले आहे. ही अत्यंत दुःखद बाब आहे. भाजपा सरकार कुटनीतींच्या धोरणांवर कुमकुवत ठरल्याचं सिद्ध झालं आहे,” असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

भारत मागे का हटला?

या ट्विटमध्येच काँग्रेसनं एक प्रश्न विचारला आहे. “गलवान व्हॅली, हॉट स्प्रिंग आणि गोगरा या तीन भागातील सीमेवर चीनसोबत कधी वाद झाला नाही, हे खरं नाही का?,” अशी विचारणा काँग्रेसनं मोदी सरकारकडे केली आहे.

गलवान व्हॅलीत १५ जून रोजी रात्री भारत-चीन सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यानंतर मोठा लष्करी संघर्ष झाला. ज्यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचेही काही सैनिक मारले गेले होते. या संघर्षानंतर चीन-भारत संबंधामध्ये तणाव निर्माण झाला होता. हा निवळण्यासाठी दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला. त्यानंतर चीननं गलवान व्हॅलीतून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 4:50 pm

Web Title: why india move back from galwan valley hot spring and gogara bmh 90
Next Stories
1 अनैतिक संबंधासाठी बायकोनं नवऱ्याला शॉक देऊन संपवलं
2 करोनाला रोखण्यात यश आलं होतं, पण एक चूक पडली महागात आणि फ्लोरिडात…
3 गलवान खोऱ्यातील ‘त्या’ तीन भागांतून चिनी सैन्य माघारी फिरलं…
Just Now!
X