News Flash

भारत-पाकिस्तानात बॅंकॉकमधल्या कैदी नंबर ८ साठी जुंपली, पण का?

बॅंकॉकच्या माहाछाई रोडवरील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगातील कैदी नंबर ८ वरुन भारत आणि पकिस्तानमध्ये जुंपली

बॅंकॉकच्या माहाछाई रोडवरील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक कडक सुरक्षा असलेल्या तुरुंगातील कैदी नंबर ८ वरुन भारत आणि पकिस्तानमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. सय्यद मुदस्सर हुसेन असं या कैद्याचं नाव असून गेल्या दोन वर्षांपासून त्याच्यावरुन बॅंकॉकच्या न्यायालयात भारत-पाकिस्तानात कायदेशीर लढाई सुरू आहे.

सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचा दावा भारताकडून केला जातोय. दुसरीकडे, तो सय्यद मुदस्सर हुसेन नसून मोहम्मद सलीम आहे आणि तो आमचा नागरिक आहे असा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. पण या कैद्यावरुन भारत पाकिस्तानात का जुंपलीये हा मोठा प्रश्न आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील अनेक गुपीत सय्यद मुदस्सर हुसेन उर्फ मुन्ना झिंगाडा याला माहितीयेत. त्यामुळे हुसेनला आपल्या ताब्यात घेऊन आंतरराष्ट्रीय स्थरावर पाकिस्तानचा पर्दाफाश करता येईल असा भारत सरकारचा विचार आहे. मात्र, पासपोर्ट दाखवून तो मोहम्मद सलीम आहे आणि वर्ष २००० मध्ये तो बॅंकॉकला आला होता असा दावा पाकिस्तानने बॅंकॉकच्या न्यायालयात आणि तेथील सरकारकडे केला आहे.

मुन्ना झिंगाडा वर्ष २००० पासून बॅंकॉकच्या तुरूंगात कैद आहे. नोव्हेंबर २०१६मध्ये पंतप्रधान मोदी बॅंकॉकला गेल्यानंतर झिंगाडाला भारतात आणाण्याच्या तयारीने जोर धरला. भारतासाठी झिंगाडा हा पाकिस्तानविरोधातील महत्त्वाचा पुरावा सिद्ध होऊ शकतो.

कोण आहे मुन्ना झिंगाडा –
झिंगाडा हा मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये राहायचा. तो दाऊद आणि छोटा शकिल यांचा अत्यंत जवळचा साथीदार आहे. मुंबईमध्ये त्याच्याविरोधात ७० हून जास्त गुन्हे दाखल आहेत. दाऊदने अरुण गवळीचा खून करण्याची जबाबदारीही मुन्नालाच दिली होती. वर्ष १९९७ मध्ये झिंगाडाला दाऊदने नेपाळच्या मार्गे पाकिस्तानात बोलावलं. त्यानंतर कट्टर दुष्मन छोटा राजनचा गेम करण्याची जबाबदारी मुन्ना झिंगाडावर देण्यात आली आणि आयएसआयच्या मदतीने मोहम्मद सलीम या नावाच्या खोट्या पासपोर्ट बनवून त्याला बॅंकॉकला पाठवण्यात आलं. बॅंकॉकमध्ये पोहोचल्यावर मुन्नाने छोटा राजनवर हल्लाही केला होता, मात्र गोळी लागूनही राजन तेव्हा वाचला होता. राजनचा सहकारी रोहित वर्मा याचा मात्र त्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर बॅंकॉक पोलिसांनी मुन्नाला अटक केली आणि तेव्हापासून तो तुरूंगात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:43 pm

Web Title: why india pakistan doing legal fighting in bangkok for custody of prisoner number 8
Next Stories
1 कर्नाटक काँग्रेसचं ATM मशिन – योगी आदित्यनाथ
2 ४५ वर्षाच्या महिलेवर लैंगिक सुखासाठी छळ केल्याचा आरोप, १७ वर्षाच्या मुलाची तक्रार
3 मोदींच्या विदेश दौऱ्यामुळे कावेरी पाणीवाटप योजनेस दिरंगाई: केंद्र सरकार
Just Now!
X