उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या  घटनेवर काँग्रेस नते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे, “मला हाथरस मधील पीडित कुटुंबास सांगायचे होते की, ते एकटे नाहीत. आम्ही तिथं त्यांच्यासाठी आहोत. उत्तर प्रदेशच्या प्रशासनाकडून संपूर्ण कुटुंबाला लक्ष्य केल्या गेलं, परंतु पंतप्रधान या प्रकरणी एक शब्द देखील बोलले नाहीत.” असं ते म

तर, लॉकडाउन काळात देशभरातील ठप्प झालेल्या उद्योगांवरून बोलताना त्यांनी, “मोदी सरकारने लॉकडाउनमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांना नष्ट केलं. ते भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत व कामगारांना रोजगार देतात. मी कोविड -१९ बद्दल फेब्रुवारीमध्ये इशारा दिला होता, परंतु मी विनोद करत असल्याचं तेव्हा ते म्हणाले होते.” असं सांगितलं.

आणखी वाचा- “सरकारने चूक सुधारावी व पीडित कुटुंबास न्याय देण्यासाठी गंभीर व्हावं, अन्यथा…”

भारत व चीनच्या सीमा वादाच्या संघर्षावरूनही त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. “तुम्हाला माहिती आहे का? चीन आपला भूभाग कसा काय ताब्यात घेऊ शकला? हे यामुळे झालं कारण चीनला माहिती आहे की, जी व्यक्ती इथं अग्रस्थानी बसली आहे, ती केवळ स्वतःचीच प्रतिमा जपते.” असं राहुल गांधी म्हणाले.

आणखी वाचा- Hathras Case: बलात्काराचे आरोपी असणाऱ्या तुरुंगात पोहचले भाजपा खासदार; म्हणे, “चहा पिण्यासाठी गेलेलो”

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यावरून बोलताना राहुल यांनी “मोदी सरकारने आणलेला कृषी कायदा म्हणजे सद्यस्थितीतील अन्न सुरक्षेच्या संरचेनेला नष्ट करण्याचा मार्ग आहे आणि याचा सर्वाधिक परिणाम पंजाब राज्यावर होणार आहे. हा आमच्या शेतकऱ्यांवर हल्ला आहे.” असं यावेळी सांगितलं.

कृषी विधेयकं मंजूर झाले तेव्हा तुम्ही परदेशात काय करत होता? या प्रश्नावर उत्तर देताना राहुल म्हणाले, “माझी आई वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती आणि माझी बहिण तिच्याबरोबर जाऊ शकत नव्हती. कारण, तिच्या कर्मचाऱ्यांपैकी काही जण करोनाबाधित होते. मी तिथे माझ्या आईबरोबर होतो. शेवटी मी तिचा मुलगा देखील आहे आणि मलाही तिला पाहावं लागेल.”

आणखी वाचा- निर्भया प्रकरणातील वकील हाथरसच्या आरोपींसाठी सुप्रीम कोर्टात देणार लढा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज कृषी कायदा, चीन सोबतचा संघर्ष इत्यादी मुद्यांवरून पंतप्रधान मोदीवर निशाणा साधला. मागील दोन दिवसांपासून राहुल गांधी पंजाबमध्ये आहेत व ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून कृषी कायद्याचा विरोध करत आहेत. आज पटियाला येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजबाजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.