आम आदमी पार्टीने दिल्लीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यंमत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्याला हजारो कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहिले नाहीत. त्याचं कारण काय? असा साऱ्यांना प्रश्न पडला आहे.

शपथविधी सोहळा झाल्यांनंतर जनतेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र ते व्यस्त असावेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत.

या सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी कुठे होते?
अरविंद केजरीवाल यांचा हा शपथविधी सोहळा दिल्लीत सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथे होते. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यामुळे ते येऊ शकते नसावेत. वाराणसी येथे त्यांनी जंगमवाडी मठाला भेट दिली. तेथे पूजाअर्चा केली. त्यानंतर ते जगतगुकरू विश्वराद्य गुरूकुल शतकोत्सव सोहळ्यासाठी गेले. तेथे त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले.

केजरीवालांसह कोणत्या मंत्र्यांनी घेतली शपथ?
केजरीवाल यांनी रविवारी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

भाजपाचा हा नेता होता मात्र उपस्थित!
केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भाजपाचा एक नेता हजर होता. त्याच्याकडेच साऱ्यांच्या नजरा होत्या. भाजपाचे नवनियुक्त आमदार विजेंद्र गुप्ता या सोहळ्याला आले आणि त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या.